Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मालेगाव कोरोनाचे हॉटस्पॉट; रुग्णांचा आकडा 10 वर

मालेगाव कोरोनाचे हॉटस्पॉट; रुग्णांचा आकडा 10 वर
, शुक्रवार, 10 एप्रिल 2020 (16:58 IST)
रात्री उशिरा सिव्हिल हॉस्पिटलला आलेल्या रिपोर्ट्स नुसार मालेगावात अजून 5 नवे कोरोना रुग्णांची भर पडली असून धक्कादायक म्हणजे चांदवड मधील एकास कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 12 झाली आहे. मालेगाव आता नाशिक जिल्ह्यातील कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून समोर येत आहे. मालेगावात लॉकडाऊनचे होणारे उल्लंघन बघून मोठ्या संख्येने रुग्ण समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात बुधवारी पहिल्यांदाच ५ जण कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यातही 40 प्रलंबित असलेल्या अहवालांपैकी 5 रिपोर्ट्स पोझिटीव्ह असून चार मालवगव तर एक रुग्ण चांदवड येथील असलयाचे अहवाल जिल्हा रुग्णालयास रात्री उशिरा प्राप्त झाले.

यामुळे जिल्हा प्रशासनाची धावपळ होत असून एकूण 400 जणांची पथके नियुक्त करून मालेगावात प्रत्येकाची चाचणी घेण्याचे ठरविले आहे. दरम्यान, या नव्या बाधीतांमध्ये एक ज्येष्ठ नागरिक तर अन्य चौघे पस्तीशीतील तरुण असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी दिली. जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या आता १२ वर पोहोचली आहे.

यातील 2 जण नाशिक मधील कोविड हॉस्पिटल महापालिकेचे डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात उपचार घेत असून अन्य 9 रुग्ण मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
या घटनेमुळे प्रशासनावरील ताण वाढला असून पालकमंत्री छगन भुजबळ व मंत्री दादा भुसे यांनी तातडीची बैठक घेऊन आढावा घेतला तर जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी मालेगावी जाऊन आढावा घेत ताळेबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोविड संशयित मृत्यू - पोलिस यंत्रणेला चौकशी न करण्याची मुभा