Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता कोरोना मृत्यूदर एक टक्क्यावर आणण्याचे उद्दिष्ट : टोपे

आता कोरोना मृत्यूदर एक टक्क्यावर आणण्याचे उद्दिष्ट : टोपे
, शनिवार, 10 ऑक्टोबर 2020 (07:40 IST)

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असून बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असून टेलिआयसीयू प्रकल्प त्यासाठी उपयुक्त ठरत आहे. त्याच्या मदतीने कोरोनामुळे होणारा मृत्यूदर एक टक्क्यावर आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगत टेलिआयसीयूचा राज्यभरात विस्तार करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.

राज्यात भिवंडी, औरंगाबाद, जालना, सोलापूर पाठोपाठ  जळगाव आणि अकोला येथील रुग्णालयांमध्ये टेलिआयसीयूचा शुभारंभ आरोग्यमंत्री टोपे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. 

राज्याचा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. टेलिआयसीयू सुविधा सध्या सहा जिल्ह्यांमध्ये सुरु आहे. राज्यात अन्यत्रदेखील सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाली असून ते याबाबत सकारात्मक आहेत. ही सेवा राज्यभर सुरु झाल्यास दुर्गम भागातील रुग्णांनादेखील विशेषज्ज्ञांच्या उपचाराचा लाभ मिळू शकेल, असे आरोग्यमंत्री  टोपे यांनी सांगितले.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

RBI ने पैशांच्या व्यवहारासंदर्भातील नियम बदलले, रेपो दर कायम ठेवले, अनेक मोठ्या घोषणा, GDP वाढेल