Marathi Biodata Maker

महाराष्ट्र कोरोना:कोरोना रुग्णांमध्ये सुमारे 10 हजारांची घट, तर 122 नवीन ओमिक्रॉन रुग्ण

Webdunia
मंगळवार, 18 जानेवारी 2022 (10:28 IST)
रविवारच्या तुलनेत कोरोना संसर्गाच्या नवीन रुग्णांमध्ये घट झाली आहे . गेल्या 24 तासांत 31,111 नवीन रुग्णांची नोंद झाली असून, 24 जण मृत्युमुखी झाले  आहे. राज्यात कोरोनाचे 2,67,334 सक्रिय रुग्ण आहेत. 29,092 रूग्णांनी या आजारा वर मात केली आहे ही देखील दिलासादायक बाब आहे . महाराष्ट्रात रविवारच्या तुलनेत आज कोरोना संसर्गाची प्रकरणे कमी झाली असली तरी ओमिक्रॉनचा धोका टळलेला दिसत नाही. आज राज्यात ओमिक्रॉनच्या 122 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात कोरोनाच्या नवीन बाधित रुग्णांची संख्या 1860 वर पोहोचली आहे.
रविवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 41 हजार नवे रुग्ण आढळले असून, 29 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र सोमवारी संसर्गाच्या रुग्णांसोबतच मृत्यूच्या संख्येतही घट झाली आहे. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून बाधितांचा आकडा 40 हजारांच्या पुढे जात होता, मात्र आज सुमारे 10 हजारांची घट होऊन नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राजधानी मुंबईत संसर्गाची प्रकरणे सातत्याने कमी होत असल्याची एक दिलासादायक बातमी आहे.

<

Maharashtra reports 31,111 new COVID cases, 29,092 recoveries, and 24 deaths today. Active cases: 2,67,334

122 patients with Omicron infection have been reported in the state today. Till date, a total of 1860 Omicron cases have been reported in Maharashtra pic.twitter.com/LQBWlVaTTN

— ANI (@ANI) January 17, 2022 >रविवारी महाराष्ट्रात ओमिक्रॉनच्या फक्त 8 नवीन रुग्णांची नोंद झाली होती, मात्र आज हा आकडा 122 वर पोहोचला आहे. ओमिक्रॉनवर शुक्रवारी आणि शनिवारी 100 हून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली. त्यात रविवारी मोठी घट झाली. मात्र, आज पुन्हा एकदा हा आकडा 100 वरून 122 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत संसर्गाचे 31 हजार 111 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, 29092 रुग्ण संसर्गातून बरे झाले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

हिंदूंना तीन मुले असली पाहिजेत, आरएसएस प्रमुख मोहन भागवत म्हणाले.....

LIVE: सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली

मुंबई : हवामान सप्ताहात नैतिक जबाबदारीवर मंत्री पंकजा मुंडे यांनी आपले विचार व्यक्त केले

T20 World Cup झिम्बाब्वे सुपर एटमध्ये पोहोचला, ऑस्ट्रेलिया बाहेर पडला

ठाणे जिल्ह्यात रस्त्याच्याबाजूला उभ्या असलेल्या डंपरला दुचाकी धडकल्याने दोन चुलत भावांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments