Festival Posters

राज्यात बुधवारी कोरोनाचे 2,219 नवीन रुग्णांची नोंद

Webdunia
गुरूवार, 14 ऑक्टोबर 2021 (09:14 IST)
राज्यात कोरोना बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत बुधवारी घट झाल्याचे दिसत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या कमी आहे. त्यामुळे राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात बुधवारी  कोरोनाचे  2,219 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 3,139 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
 
राज्यात आतापर्यंत 64 लाख 11 हजार 075 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.38 टक्के आहे. तसेच 49 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 39 हजार 670 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर  2.12 टक्के इतका झाला आहे.
 
 सध्या राज्यात 29 हजार 555 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 05 लाख 46 हजार 572 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 83 हजार 896 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 32 हजार 261 लोक होम क्वारंटाईन आहेत तर 1,122 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

कोपरगाव-मालेगाव महामार्गासाठी 980 कोटी रुपये मंजूर, गडकरी यांनी निधीला मान्यता दिली

LIVE: नागपूर काँग्रेसने 125 जागांसाठी आपले उमेदवार निश्चित केले

नागपुरात ख्रिसमसच्या उत्सवादरम्यान हिंसाचार, हाणामारीत तरुणाचा मृत्यू

सोने-चांदी पुन्हा महागले, सर्व विक्रम मोडले

सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खायला घालणे महागात पडले, न्यायालयाने दंड ठोठावला

पुढील लेख
Show comments