Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिक कोरोनचा हॅाटस्पॅाट, आणखी यंत्रणा सक्षम व सशक्त करण्याची गरज – दरेकर

नाशिक कोरोनचा हॅाटस्पॅाट, आणखी यंत्रणा सक्षम व सशक्त करण्याची गरज – दरेकर
, रविवार, 28 मार्च 2021 (10:16 IST)
नाशिक कोरोनचा हॅाटस्पॅाट बनला आहे. आणखी यंत्रणा सक्षम व सशक्त करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केले. ते म्हणाले की, नाशिकमध्ये व्हेंटीलेटरचे बेड कमी पडता आहे. मी आताच मनपा आयुक्तांशी चर्चा केली. त्यांनी २०० बेड वाढवण्याचे मान्य केले. त्याचप्रमाणे एसएनडीटीत १०० बेड वाढवावे असेही त्यांनी सांगितले.  भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. 
यावेळी कोरोना लसीबाबत बोलतांना दरेकर म्हणाले  की, २० लाखाची डोसची जिल्हयात आवश्यकता आहे. पण, तीन लाख डोस उपलब्ध आहे. १७ लाख शाॅर्टेज आहे. ४५ वयोगटातील जेव्हा देण्यात येतील तेव्हा ४० लाख डोसची आवश्यकता लागेल. त्यामुळे जास्तीत जास्त लसीकरणाचे डोस उपलब्ध करुन द्यावे यासाठी मी केंद्र व राज्य शासनाना विनंती करणार आहे.
राज्य सरकार बाबत बोलतांना ते म्हणाले की, कोरोना नियंत्रण आणण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त १० जिल्ह्यापैकी ९ जिल्हे राज्यातील आहे. त्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. पण,  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री हे लॅाकडाउन करण्याचा फक्त दम भरतात.  जेथे लॅाकडाऊनची गरज आहे तेथे करावी, पण, सरसकट ते करता कामा नये असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी त्यांनी राज्य सरकारने समन्वयातून मार्ग काढायला हवा असेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी अवकाळीग्रस्त शेतक-यांची सटाणा तालुक्यातील भेटीची माहिती दिली. ते म्हणाले की, सरकारने अवकाळीग्रस्त शेतक-यांचे सरसकट पंचनामे करुन तात्काळ १ लाख हेक्टरी प्रमाणे मदत करावी. या शेतक-यांची भेटी कृषीमंत्री, पालकमंत्री व शासनाच्या प्रतिनिधीने अद्याप घेतली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वीज बिलाच्या वसुलीला हिंसक विरोध करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार