Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या दोन लाखांच्या खाली

ज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या दोन लाखांच्या खाली
, शनिवार, 5 जून 2021 (08:38 IST)
महाराष्ट्रात नव्याने वाढ होणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या कमी, आणि बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या दोन लाखांच्या आत आली असून सध्या 1 लाख 96 हजार 894 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
 
राज्यात शुक्रवारी 14 हजार 152 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 20 हजार 852 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील आत्तापर्यंत संक्रमित झालेल्या एकूण कोरोना बाधितांचा आकडा 58 लाख 05 हजार 565 इतका झाला आहे. त्यापैकी 55 लाख 07 हजार 058 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्रात 289 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. आत्तापर्यंत 98 हजार 771 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.7 टक्के एवढा आहे. राज्याचा रिकव्हरी रेट वाढला असून, सध्या 94.86 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत 3 कोटी 60 लाख 31 हजार 395 नमूने तपासण्यात आले आहेत. राज्यात सध्या 14 लाख 75 हजार 476 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 7 हजार 430 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठा आरक्षण प्रकरणी पुनर्विलोकन याचिका दाखल करा ; भोसले समितीची शिफारस