Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यातील बड्या व्यावसायिकाला हवा होता पैशांचा पाऊस; तब्बल 52 लाख मोजले पण…

पुण्यातील बड्या व्यावसायिकाला हवा होता पैशांचा पाऊस; तब्बल 52 लाख मोजले पण…
, शुक्रवार, 4 जून 2021 (16:03 IST)
जादूटोणाच्या माध्यमातून पैशांचा पाऊस पाडतो म्हणून फसववणूक करणाऱ्या एका भोंदूबाबाला गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याने 52 लाख रुपये देखील पैशांचा पाऊस न पडल्याने एका व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आणला आहे. किसन आसाराम पवार (वय 41, रा. हिवरखेड ता. मंठा) असे अटक केलेल्या भोंदूला अटक केली आहे. याप्रकरणी सिंहरोड पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. याबाबत 40 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.यातील तक्रारदार हे मोठे व्यावसायिक आहेत.
 
दरम्यान, कॉमन मित्राच्या माध्यमातून आरोपी भोंदू किसन पवार याच्याशी ओळख झाली होती. यानंतर फिर्यादी हे दोन ते तीन वेळा त्यांच्याकडे जाऊन आले होते. यावेळी त्याने वेगवगेळे मंत्र म्हणून आणि माझ्यात दैवी शक्ती असल्याचे बोलून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांना थेट पैशांचा पाऊस पडतो असे सांगत काही पूजा करावी लागेल असे सांगितले. फिर्यादी यांचाही यावर विश्वास बसला. त्यानंतर त्यांना या पूजा करण्यासाठी पैसे लागतील असे सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळो एकुण 52 लाख 1 हजार रुपये घेतले. पण त्यांना या भोंदू बाबाने पैशांचा काही पाऊस पाडला नाही. त्यानंतर 
 
फिर्यादी यांना आपली फसववणूक होत असल्याचे लक्षात आले. मग त्यांनी गुन्हे शाखाकडे तक्रार दिली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संभाजीराजेंनी दिला ट्विटद्वारे इशारा