Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वाचा, टोकियो ऑलिम्पिक कधी होणार

वाचा, टोकियो ऑलिम्पिक कधी होणार
, मंगळवार, 31 मार्च 2020 (07:17 IST)
जगभरात पसरलेल्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका, जपानच्या टोकियो शहरात होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेलाही बसला. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने परिस्थितीचं गांभीर्य ओळखत ही स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलली आहे. २०२१ साली होणाऱ्या या स्पर्धेच्या नवीन तारखा आज जाहीर करण्यात आल्या आहेत. २३ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान ही स्पर्धा रंगणार असल्याचं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने स्पष्ट केलंय. 
 
गेल्या काही दिवसांमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेच्या आयोजनासाठी ज्या-ज्या संघटनांनी हातभार लावला आहे, त्या सर्वांचा मी आभारी आहे. जपान सरकार, टोकियोचं स्थानिक प्रशासन आणि सर्वांच्या सहकार्याने आपण या संकटाचा सामना करु असा मला विश्वास आहे, अशा शब्दांत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष थॉमस ब्लाख यांनी आभार मानले. इतर महत्वाच्या स्पर्धांसोबत ऑलिम्पिकचं आयोजन होणार नाही याची काळजी घेऊन नवीन तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारतात अजून करोना व्हारसचा समूह संसर्ग नाही