rashifal-2026

दिलासादायक, कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावला

Webdunia
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020 (08:31 IST)
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण सातत्यानं वाढताना दिसत होते. पण रुग्णवाढीचा वेग मंदावल्याचं दिलासादायक चित्र  समोर आलं आहे. सोमवारी राज्यात 5,984 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, 15 हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 13,84,879 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.48 % एवढे झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 
 
राज्यात सोमवारी 125 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.  सध्या राज्यातील मृत्यूदर 2.64 % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 81,85,778 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 16,01,365 (19.56 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 24,14,577 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 23,285 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात एकूण 1,73,759 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात 5,984 नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 16,01,365 झाली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

Ladki Bahin Yojana मकर संक्रांतीला महिलांना ₹३,००० मिळतील का? कोण पात्र आहे आणि कोण अपात्र?

पाकिस्तानच्या सिंधमध्ये हिंदू शेतकऱ्याची हत्या, जनतेत संतापाची लाट

अंथरुण ओले केल्यामुळे सावत्र आईने गरम चमच्याने पाच वर्षांच्या मुलीच्या गुप्तांग जाळले

मंदिरे पाडण्याबाबत अजित डोवाल यांचे आतापर्यंतचे सर्वात मोठे विधान

पुणे निवडणुकीसाठी पवार कुटुंब एकत्र आले, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला

पुढील लेख
Show comments