Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जियोकडून कोरोनासाठी एक नवीन फीचर, करा कोरोनाची तपासणी

Webdunia
गुरूवार, 26 मार्च 2020 (08:41 IST)
जीवघेण्या करोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी रिलायंस जिओने युजर्सना या व्हायरसबाबतची सर्व आवश्यक माहिती देणारे एक नवीन फीचर आणले आहे. कंपनीने आपल्या MyJio App मध्ये काही नवीन फीचर्सचा समावेश केलाय. या नव्या फीचर्समुळे युजर स्वतःच व्हायरसच्या लक्षणांची तपासणी करू शकतील. विशेष म्हणजे जिओने नॉन जिओ ग्राहकांसाठीही आपले MyJio App हे अ‍ॅप ‘ओपन’ ठेवले आहे. त्यामुळे आता कोणत्याही टेलिकॉम कंपनीचा युजर हे अ‍ॅप डाउनलोड करुन करोना व्हायरसच्या लक्षणांची तपासणी करु शकेल. 
 
MyJio App मध्ये एका बॅनरवर #CoronaHaaregaIndiaJeetega असे लिहिलेले दिसत आहे. या अ‍ॅपच्या अँड्रॉइड व्हर्जनमध्ये symptoms checker हा नवा पर्याय आलाय. याशिवाय, देशभरातील करोना व्हायरस टेस्ट सेंटर्सची लिस्ट, टेस्ट सेंटर्सचा पूर्ण पत्ता, करोनाग्रस्तांची आकडेवारी, हेल्पलाइन नंबर आणि FAQ यांसारखे अनेक पर्यायही आहेत. symptoms checker या फीचरचा वापर करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन MyJio App अपडेट करावे लागेल. symptoms checker द्वारे तुम्हाला आरोग्य आणि प्रवासाबाबत प्रश्न विचारले जातील, आणि उत्तरांच्या आधारे करोना व्हायरस होण्याची शक्यता आहे किंवा नाही हे सांगितले जाईल. 
 
असा करायचा वापर :-
 
MyJio App अ‍ॅप ओपन केल्यानंतर तुम्हाला #CoronaHaregaIndiaJeetega हे लिहिलेल्या बॅनरवर टॅप करावे लागेल. यानंतर स्क्रीनवर तुम्हाला Check your symptoms now असा पर्याय दिसेल. त्यानंत पुढील स्क्रीनवर symptoms checker ऑप्शनवर टॅप करा. यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील.
 
1) सर्वात पहिला प्रश्न असेल, ही टेस्ट तुम्ही कोणासाठी करत आहात.
2) यानंतर तुमचं वय किती असा प्रश्न विचारला जाईल
3) आरोग्याबाबत प्रश्न विचारले जातील.
4) गेल्या 14 दिवसांमध्ये तुम्ही कुठे प्रवास केला याबाबत प्रश्न विचारले जातील
 
वर उल्लेख केलेल्या प्रश्नांशिवाय अन्य प्रश्नही विचारले जातील. सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुमच्यासमोर रिझल्ट येईल. त्यामध्ये तुम्हाला COVID-19 होण्याची किती शक्यता आहे, म्हणजे ‘रिस्क रेट’ दर्शवला जाईल. करोना व्हायरसबाबत आतापर्यंत जी माहिती मिळाली आहे त्या माहितीच्या आधारावर ही टेस्ट असल्याचा उल्लेखही अ‍ॅपमध्ये करण्यात आलाय.

संबंधित माहिती

ICC T20 Rankings: T20 अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक सातव्या क्रमांकावर

नववधू आणि वर यांच्यात भांडण, एकमेकांना धक्काबुक्की करत लाथा मारल्या

मालदा मध्ये वीज कोसळल्याने 11 लोकांचा मृत्यू

बेजवाबदारपणा, डॉक्टरांनी बोटाच्या जागी जिभेची केली सर्जरी

JEE Advanced 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या लिंकवरून डाउनलोड करा

नवीन पिढीला संधी देत नाहीये पीएम नरेंद्र मोदी, तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी आहे उत्सुक- उद्धव ठाकरे

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : मलब्यामधून खराब अवस्थेत निघाल्या 73 गाड्या, 4 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपले

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

पुढील लेख
Show comments