Dharma Sangrah

हॉगकाँगमध्ये दुसऱ्यांदा कोरोना झालेला पहिला रुग्ण आढळला

Webdunia
मंगळवार, 25 ऑगस्ट 2020 (08:48 IST)
कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना पुन्हा संसर्ग होण्याचा धोका आहे. कारण  हॉगकाँगमध्ये दुसऱ्यांदा कोरोना झालेला पहिला रुग्ण आढळून आला आहे. याबाबत हॉगकाँग विद्यापीठानं हा दावा केला आहे. 
 
हॉगकाँग विद्यापीठातील संशोधकांनी सांगितलं की, “हॉगकाँगमधील एका व्यक्तीला दुसऱ्यांदा कोरोना झाल्याचं सिद्ध झालं आहे. ही नोंदणीकृत पहिलीच घटना आहे. ३३ वर्षीय आयटी कर्मचाऱ्याला एप्रिलमध्ये कोरोना झाला होता. त्यातून बरं झाल्यानंतर त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. त्या कर्मचाऱ्याला ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातील स्पेनमधून परतल्यानंतर पुन्हा कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं आहे. कोरोना चाचणी केल्यानंतर हे समोर आलं,” असं संशोधकांनी म्हटलं आहे.
 
कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना पुन्हा संसर्ग होत नसल्याचा दावा वारंवार केला जात असतानाच ही घटना समोर आली आहे. तज्ज्ञांनी असं म्हटलं होतं की, कोरोना रुग्ण बरा झाल्यानंतर त्याच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. त्यामुळे पुन्हा संक्रमण होण्याची शक्यता कमी असते. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

पॅट कमिन्सने 6 महिन्यांनंतर शानदार पुनरागमन केले, 3 विकेट्स घेतल्या आणि इंग्लंडला मागे टाकले

LIVE: दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजनेत मोठा बदल

भाजपने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे ऑपरेशन सिंदूरवरील विधान देशविरोधी म्हटले

राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांनी आमदारपदाचा राजीनामा देत भाजप मध्ये प्रवेश केला

टेनिस जगातील अल्काराज-फेरेरो जोडी विभक्त झाली, सात वर्षांची भागीदारी संपुष्टात आली

पुढील लेख