Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात तसेच भारतात कोरोना व्हायरसचे फारसे रुग्ण न होण्याचे मुख्य कारण

Webdunia
मंगळवार, 3 मार्च 2020 (16:15 IST)
गेल्या दीड महिन्यात पुण्यातील 'एनआयव्ही'कडे करोनाच्या रुग्णांची तपासणी केली जात आहे. त्या ठिकाणी चाचणी केल्यानंतरच पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असल्याचे निष्पन्न होते. या चाचण्या करण्यासाठी एनआयव्ही सक्षम आहे. देशात अनेक ठिकाणी रुग्ण आढळण्याच्या शक्यतेने पुण्याशिवाय देशभरात आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या 14 ठिकाणच्या प्रयोगशाळांमध्ये सुमारे तीन हजार कोरोना संशयित नमुन्यांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी पाच रुग्न भारतात पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. अशी माहिती डॉ. गंगाखेडकर यांनी दिली.

महाराष्ट्रात तसेच भारतात कोरोना व्हायरसचे फारसे रुग्ण न होण्याचे मुख्य कारण 
चीनमधून इतर देशांत कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. त्याचे कारण म्हणजे, ते देश अधिक विकसित असून भारताच्या तुलनेत इतर देशांतील नागरिक मोठ्या संख्येने चीनमध्ये विमानाने प्रवास करतात. प्रवाशांच्या जास्तीच्या संख्येमुळे इतर देशांत याचे रुग्ण वाढलेले आहेत. या तुलनेत भारतातून चीनला जाणार्‍यांची संख्या कमी असल्याने भारतातवर तितकासा प्रभाव पडलेला नाही. 
 
महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी उचलण्यात येणारे पावले 
कोरोनाविषयी भारतापुढे आव्हान वाढले आहे. चीनसह कोरोनाबाधित देशांतून भारतात तसेच महाराष्ट्रात येणार्‍या प्रवाशांचे स्क्रीनिंग देशातील आंतरराष्ट्रीय विमानतळांवर केले जात आहे. त्यातून ज्या रुग्णांना ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे आढळून येत आहेत, त्यांना तेथील सरकारी रुग्णालयांतील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात येत असून त्यांनी नमुने पुण्यातील एनआयव्हीसह देशातील आणखी 13 प्रयोगशाळांना पाठविण्यात येत आहेत. डॉ. गंगाखेडकर म्हणाले, भारतात कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी जी पावले उचचली आहेत त्यामुळे तो वाढलेला नाही. परंतु तो वाढणार नाही, असेही नाही. त्यासाठी सर्वांनिच काळजी घेणे गरजेचे आहे. रस्त्यावर न थुंकणे, नाकातोंडाला हात न लावणे, खोकताना-शिंकताना तोंडासमोर रुमाल धरणे, वारंवार हात धुणे ही काळजी घेणे गरजेचे आहे.
 
गर्दी
खेळांचे सामने किंवा तत्सम गर्दीच्या कार्यक्रमांमधून संसर्गजन्य रोग पसरण्याची शक्यता अधिक असते. विशेषत: कोरोना व्हायरससारख्या विषाणूंबाबत तर अधिकच भीती असते. हेच लक्षात घेऊन शांघायमध्ये आयोजित करण्यात आलेली फॉर्म्युला वन ग्रँड प्रिक्स पुढे ढकलण्यात आली. 

संशयित/रुग्णाला एकटं ठेवणं महत्त्वाचं
कोरोना व्हायरसचा उद्रेक झालेल्या ठिकाणांहून परतणाऱ्या लोकांनी स्वत:हून काही काळ वेगळं राहावं, असं यूकेमध्ये सांगण्यात आलंय.
 
तर भारतात कोरोना नियंत्रणाबाहेर जाईल 
भारतात जे कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले आहेत, त्यांना संसर्ग इतर देशांतून झालेला आहे. भारतात अद्याप कोरोना पॉझिटिव्ह रुग्णापासून दुसर्‍या रुग्णाला प्रसार झाल्याचे उदाहरण अद्याप नाही. परंतु तसे झाले तर आपल्याकडे लोकसंख्येचे प्रमाण जास्त असल्याने त्याचा प्रसार खूप वेगाने होईल आणि त्याला नियंत्रणात आणण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. भारतीय हवामान पाहता आणि उन्हाळा सुरू झाल्याने कोरोनाच्या प्रसाराच्या वेगावर नियंत्रण येईल, असे डॉ. गंगाखेडकर यांनी स्पष्ट केले.
 
17 दिवस जिवंत राहतो कोरोना विषाणू
कोरोनाचा विषाणू हा हवेत जगू शकत नाही. बाधित व्यक्तीच्या थुंकीतून दुसर्‍या निरोगी व्यक्तीला त्याचा संसर्ग होऊ शकतो. जर बाधित व्यक्ती इतरत्र थुंकली व त्या थुंकीवर ऊन पडले नाही किंवा ती जागा ओली राहिली, तर त्यामुध्ये कोरोनाचा विषाणू 17 दिवस जिवंत राहू शकतो. त्यासाठी ‍प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करावा, असे डॉ. खेडकर यांनी सांगितले.
 
एकापासून दुसर्‍यास संसर्गाचा वेग जास्त 
एकापासून संपर्कात आलेल्या दुसर्‍या निरोगी व्यक्तीला स्वाइन फ्लूच्या तुलनेत कोरोनाचा संसर्ग वेगाने होतो, परंतु त्याच्या मृत्यूची टक्केवारी स्वाइन फ्लूपेक्षा कमी आहे. कोरोनाच्या मृत्यूची टक्केवारी सध्या 4 इतकी आहे.
 
मधुमेह व रक्तदाब असणार्‍या रोग्यांना याचा अधिक धोका 
रक्तदाब, मधुमेह, दमा आहे अशा रुग्णांना कोरोनाचा धोका सर्वसामान्य व्यक्तींच्या तुलनेत 10 ते 12 पट अधिक आहे. तसेच त्यांच्या मृत्यूचा दरही अधिक आहे.
 
कोरोनाबाधित देशांचा प्रवास टाळा
गरज नसताना कोरोनाबाधित देशांना प्रवास करणे टाळावे. तसेच इराणसह काही देश त्यांच्या येथे असलेल्या भारतीय नागरिकांना भारतात येण्यासाठी व्हिसा देत नाहीत, अशी परिस्थिती आहे. प्रवासाबाबत प्रत्येक देशाचे धोरण वेगवेगळे असून ते सतत बदलत आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

राहुल गांधी यांच्या परभणी दौऱ्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

महाराष्ट्रातील मतदार यादीतील अनियमिततेच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने दिले उत्तर

LIVE: पालघरमध्ये वनविभागाच्या अधिकाऱ्यावर लाच मागितल्याचा आरोप,गुन्हा दाखल

पालघरमध्ये वनविभागाच्या अधिकाऱ्यावर लाच मागितल्याचा आरोप,गुन्हा दाखल

मेंढरमध्ये लष्कराचे वाहन कोसळले पाच जवानांचा मृत्यू,अनेक जवान जखमी

पुढील लेख