महाराष्ट्रात मुंबईसह अनेक ठिकाणी सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात गेल्या 24 तासांत कोरोना आजाराचे 2 हजार 956 नवे रुग्ण आढळले आहेत तर 2हजार 165 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच गेल्या 24 तासांत 04 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झालाआहे. मुंबईत कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन फॉर्मच्या BA.4 सब-व्हेरियंटचे तीन आणि BA.5 सब-व्हेरियंटचे एक प्रकरण नोंदवले गेले आहे. सर्व रुग्ण या आजारातून बरे झाल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या मते, BA.4 आणि BA.5 हे कोरोनाच्या अतिसंसर्गजन्य ओमिक्रॉन स्वरूपाचे सब व्हेरियंट आहेत. जागतिक महामारीची तिसरी लाट देशात ओमिक्रॉनमुळे आली.
आरोग्य विभागाने सांगितले की, महानगरपालिका संचालित कस्तुरबा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेच्या अहवालात महानगरातील तीन रुग्णांमध्ये BA.4 सब व्हेरियंट आणि एका रुग्णामध्ये BA.5 व्हेरियंट असल्याची पुष्टी झाली आहे. या चार रुग्णांमध्ये दोन मुली आणि दोन पुरुष आहेत. मुलींचे वय 11 वर्षे आणि पुरुषांचे वय 40 ते 60 वर्षे आहे. विभागाने सांगितले की, सर्व रुग्णांनी होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण केला आहे आणि ते आजारातून बरे झाले आहेत.