Dharma Sangrah

तिसऱ्या लाटेचा मुंबई, पुण्याला सर्वाधिक धोका

Webdunia
गुरूवार, 26 ऑगस्ट 2021 (22:02 IST)
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत (Corona 3rd Wave) देण्यात येत आहे. या लाटेचा सर्वाधिक परिणाम मुंबई आणि पुणे येथे जाणवणार असून या दोन शहरांमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद केली जाऊ शकते. तर राज्यात बाधितांची संख्या ६० लाखाच्यावर जाऊ शकते असे महत्वपूर्ण निरीक्षण सार्वजनिक आरोग्य विभागाने नोंदवले आहे.
 
दुसऱ्या लाटेत ११ मार्च रोजी दिवसाला ९१,१०० कोरोना रुग्णांची भर पडत होती.हाच आकडा तिसऱ्या लाटेत मुंबईसाठी दिवसाला १ लाख ३६ हजार रुग्णांपर्यंत पोहोचू शकतो.पुण्यात १९ मार्च रोजी दिवसाला १.२५ लाख रुग्णांची नोंद झाली होती.तिसऱ्या लाटेत हीच संख्या तब्बल १.८७ लाख रुग्णांपर्यंत पोहोचू शकते.
असेही आरोग्य विभागाने म्हंटले आहे. त्यामुळे या दोन शहरातील बाधितांची संख्या नियंत्रणात किंबहुना या लाटेवर मत करण्यासाठी आरोग्य विभागाला सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याची गरज असून त्या दृष्टीने काम सुरू असल्याचेही आरोग्य विभागाने सांगितले.
 
तिसऱ्या लाटेच्या अंदाजात मुंबईत व्यक्त करण्यात आलेले शिखर हे १.३६ लाख रुग्णांचे आहे.यात ८८ हजार ८२३ रुग्णांना होम क्वारंटाइन, ४७ हजार ९२८ रुग्णांना रुग्णालयात आणि ९५७ रुग्णांना अतिदक्षता विभागातील खाटांची गरज भासू शकते.तर पुण्याच्या बाबतीत १.२१ लाख रुग्णांवर होम क्वारंटाइन आणि १३१४ रुग्णांना अतिदक्षता खाटांची गरज भासू शकते.ठाण्यातही तशीच काहीशी परिस्थिती असून तिसऱ्या लाटेत बाधितांची संख्या १.३ लाखांपर्यंत पोहोचू शकतो आणि ९११ जणांना अतिदक्षता खाटांची गरज भासू शकते.
दुसऱ्या लाटेत दैनंदिन रुग्णवाढीचे शिखर ८६ हजार ७३२ पोहोचले होते.नागपूरमध्ये रुग्णसंख्या ८० हजारांवरून वाढून १.२१ लाख इतकी होऊ शकते.
यात ८५० जणांना अतिदक्षता विभागातील खाटांची गरज पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.दरम्यान, तिसऱ्या लाटेत मुंबईला २५० मेट्रिक टन (एमटी) ऑक्सिजनची गरज भासू शकते. पुण्यात हाच आकडा २७० मेट्रिक टन इतका होऊ शकतो. ठाण्यात १८७ एमटी, नागपुरात १७५ एमटी व नाशिकला ११४ एमटी इतक्या ऑक्सिजनची गरज पडू शकते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

LIVE: रोहित पवार यांची बागेश्वर बाबांवर टीका

रोहित पवार यांची बागेश्वर बाबांवर टीका, स्वतःचे मुलं जन्माला घाला

धावत्या ट्रेनच्या स्लीपर कोचला अचानक आग, प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या घेतल्या

दिल्लीच्या आयजीआय विमानतळावर स्विस एअरच्या विमानाला उड्डाण करताना तांत्रिक बिघाड, मोठा विमान अपघात टळला

KKR vs LSG : गुणतालिकेत तळाशी असलेल्या कोलकाता आणि लखनौ या दोन संघांसाठी हा 'करा किंवा मरा' सामना आहे

पुढील लेख
Show comments