rashifal-2026

दानशूर कोटक समूह, केले कोट्यवधींचे दान

Webdunia
शुक्रवार, 10 एप्रिल 2020 (08:37 IST)
कोटक महिंद्रा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय कोटक यांनीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फंडाला कोट्यवधींचं दान केलं आहे. उदय कोटक यांनी २०२०-२१ या आर्थिक वर्षात पगार न घेण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षभर पगाराच्या स्वरूपात केवळ १ रुपया घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता उदय कोटक यांनी हा निर्णय घेतला आहे. उदय कोटक यांच्याशिवाय त्यांच्या समूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही त्यांच्या पगारामध्ये १५ टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कोटक महिंद्रा बँकेने गुरुवारी निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे.

कोटक समूहाने कोरोना विषाणूला रोखण्यासाठी इतर प्रकारची मदत व सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती दिली आहे. कोटक महिंद्रा बँकेने पीएम केअर्स फंडात २५ कोटी रुपये देणगीच्या स्वरूपात दिले आहेत. तसेच महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दहा कोटी रुपये जमा केले आहेत. त्याचबरोबर उदय कोटकदेखील व्यक्तिगत स्वरूपात २५ कोटी रुपयांचं दान करणार आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mithun Varshik Rashi Bhavishya 2026 in Marathi मिथुन राशी २०२६ राशीभविष्य

काळा रंग अशुभ मानतात मग मंगळसूत्रांमध्ये काळे मणी का असतात? ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय?

Nanad Bhavjay Relationship नणंद- वहिनी यांच्यातील नाते कमकुवत करतात या चुका

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

Datta Jayanti 2025 दत्त जयंती कधी? दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मुंबईतच नाही तर इथेही ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढवणार

LIVE: MPSC परीक्षेच्या निकालावर सुप्रिया सुळेंनी सरकारला घेरले

पुढील वर्षापासून शेतकऱ्यांना वर्षाचे365 दिवस वीज आणि पाणी मिळेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची यवतमाळ मध्ये घोषणा

नक्षलवादी विकास नागपुरेने 11नक्षलवाद्यांसह गोंदिया पोलिसांना आत्मसमर्पण केले

मुंबईतील वाढत्या प्रदूषणावरून उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

पुढील लेख
Show comments