Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रात लसीकरण बंद पडू शकतं, ४० लाख लसींचा पुरवठा करण्याची मागणी

Webdunia
बुधवार, 7 एप्रिल 2021 (15:07 IST)
महाराष्ट्राला वेळेत पुरवठा न झाल्यास तीन दिवसांमध्ये लसीकरण बंद पडण्याची भीती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे महाराष्ट्राला आठवड्याला ४० लाख लसींचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. 
 
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची ११ राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली असून या बैठकीत टोपे यांनी वॅक्सीनेशन, ऑक्सिजन तसंच रेमडेसिवीरच्या वापरासंबंधी काही महत्वाच्या सूचना केल्या. 
 
मुंबईत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबद्दल माहिती देत म्हटले की प्रकाश जावडेकर यांनी तीन लाख लसीकरण करत असताना सहा लाख करण्यास सांगितलं. यासाठी केंद्र सरकारकडून डोस पुरवले जातील असं सांगण्यात आलं असलं तरी साडे चार लाखांमध्येच लस नाही म्हणून केंद्र बंद ठेवावं लागत आहेत. लोकांना लस नसल्याचे सांगावं लागत आहे.
 
त्यांनी म्हटले की लसीकरण करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचं राज्य असून लस मिळत नाही हा मोठा प्रश्न आहे. सर्वात जास्त बाहेर पडणार्‍यांमध्ये २० ते ४० वयोगटातील तरुण असून लवकरच १८ पुढील सर्वांचं लसीकरण गरजेचं आहे. राज्यातील तरुण तरुणींना सुरक्षित करायचं असल्यामुळे केंद्राकडून याची लवकर परवानगीची टोपे यांनी मागणी केली. केंद्र सरकार लस पाठवत नाही असं नाही पण वेग कमी आहे अशी टीका राजेश टोपे यांनी केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

रोहित पवारांचा आरोप- भाजप सदस्यांचा EVM स्ट्राँग रूममध्ये शिरण्याचा प्रयत्न

LIVE:निवडणूक निकालापूर्वी नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ, समीर वानखेडे यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोला ट्रकची धडक, चार जण जागीच ठार

साताऱ्यात निवडणूक ड्युटीवरून परतणाऱ्या तलाठ्याचा अपघाती मृत्यू

निवडणूक निकालापूर्वी नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ, समीर वानखेडे यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

पुढील लेख
Show comments