Festival Posters

डिसेंबर अखेर परवानगी मिळाल्यास जानेवारीपासून लसीकरण शक्य : टोपे

Webdunia
शुक्रवार, 18 डिसेंबर 2020 (10:40 IST)
सीरम इन्स्टिटय़ूट’ आणि ‘भारत बायोटेक’ या कंपन्यांनी कोरोनावरील लसीसाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. डिसेंबर अखेर ही परवानगी मिळाल्यास जानेवारीपासून राज्यात लसीकरण सुरू होऊ शकते. राज्यात लसीकरणाची तयारी पूर्ण होत आली असून, आता लस आणि केंद्राच्या आदेशाची वाट पाहत असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
 
कोरोनावरील लस दृष्टिपथात आली असून दोन कंपन्यांनी केंद्र सरकारकडे लसीकरणासाठी परवानगी मागितली आहे. तर केंद्राच्या माध्यमातून लसीकरणाचे सूक्ष्म नियोजन सुरू आहे. मतदानासाठी ज्या पद्धतीने बूथ उभारले जातात त्याच पद्धतीने लसीकरणासाठी बूथ उभारले जाणार आहेत. लस केव्हा देणार त्याची तारीख दिली जाईल. त्याबाबतचा संदेश संबंधित व्यक्तीला पाठवला जाईल. त्यानुसार ओळखपत्रासह लसीकरणाच्या ठिकाणी गेल्यावर खात्री करून त्या व्यक्तीला लस दिली जाईल. त्यानंतर तिथे अर्धा तास थांबवून मग त्या व्यक्तीला घरी सोडले जाईल असे टोपे यांनी सांगितले.
 
१८ हजार कर्मचाऱ्यांना त्यासाठी प्रशिक्षण देण्यात येत असून ते अंतिम टप्प्यात आहे. पहिल्या टप्यात आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवांमधील कर्मचारी, ५० वर्षांवरील व ५० वर्षांखालील सहव्याधिग्रस्त नागरिक अशा पद्धतीने लसीकरण केले जाणार असून त्याची आकडेवारी केंद्राला पाठविण्याचे काम सुरू आहे. लसीकरणाचा खर्च केंद्र सरकारच उचलेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mithun Varshik Rashi Bhavishya 2026 in Marathi मिथुन राशी २०२६ राशीभविष्य

काळा रंग अशुभ मानतात मग मंगळसूत्रांमध्ये काळे मणी का असतात? ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय?

Nanad Bhavjay Relationship नणंद- वहिनी यांच्यातील नाते कमकुवत करतात या चुका

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

Datta Jayanti 2025 दत्त जयंती कधी? दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: शिवसेना आमदार नीलेश राणे यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल

Cyclone Ditva दक्षिण भारतात पाऊस आणि वादळाचा तडाखा, शाळा आणि महाविद्यालये बंद तर विमानसेवा रद्द

शिवसेना आमदार नीलेश राणे यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल; भाजप समर्थकाच्या घरात जबरदस्तीने घुसल्याचा आरोप

ठाणे : महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या

झुंझुनूमध्ये अनेक मेंढ्यांचे मृतदेह विखुरलेले आढळले

पुढील लेख
Show comments