Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 29 April 2025
webdunia

दुखापतग्रस्त खेळाडूंमुळे परेशान टीम इंडियासाठी चांगली बातमी

cricket news
वर्ल्ड कप 2019 मध्ये खेळाडूंच्या दुखापतीमुळे परेशान टीम इंडियासाठी एक चांगली बातमी आहे. जखमी गोलंदाज भुवनेश्वर कुमार प्रॅक्टिस करत आहे. भुवनेश्वर कुमारने ओल्ड ट्रॅफर्डमध्ये संघाच्या अभ्यास सत्रात भाग घेतला. तथापि, भुवनेश्वरच्या सामन्यात खेळण्यावर संशय आहे.
 
पाकिस्‍तानविरुद्ध सामन्यात भुवनेश्वर कुमारला डाव्या पायाच्या स्नायूंच्या ताण जाणवल्यामुळे मधून बाहेर पडावं लागलं होतं. तेव्हा तो दोन-तीन सामन्यात खेळू शकणार नाही असे सांगण्यात आले होते. भुवनेश्वर कुमारने या वर्ल्ड कपच्या 3 सामन्यातून 5 विकेट घेतले आहे.
 
भुवनेश्वर स्नायूंच्या ताणामुळे परेशान होतो. बीसीसीआयने एक ट्विट केले आहे ज्यात भुवनेश्वर कुमार गोलंदाजीचा अभ्यास करताना दिसत आहे. तरी नेट प्रॅक्टिसमध्ये तो पूर्ण रनअपहून गोलंदाजी करताना दिसत आहे. भुवनेश्वर कुमार पाकिस्तानविरुद्ध खेळताना जखमी झाला होता.
 
टीम इंडियाला पुढील सामना गुरुवारी 27 जून रोजी वेस्टइंडीज विरुद्ध असून भुवनेश्वर त्यात खेळणार अथवा नाही हे स्पष्ट झालेले नाही. अफगाणिस्तानाविरुद्ध सामन्यात भुवनेश्वरच्या जागी सामील शमीने उत्तम गोलंदाजी करत हॅट्रिक केली होती.
 
भुवनेश्वर वेस्टइंडीजविरुद्ध सामन्यापूर्वी फिट झाला तरी त्याला संघात शमीच्या जागेवर घेतल्या जाण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे.
 
नवदीप सैनी देखील टीम इंडियाला जुळले होते. भुवनेश्वरच्या कव्हर रूपात तो इंग्लंड पोहचल्या असल्याचे सांगण्यात येत होते. परंतू नंतर सैनी नेट गोलंदाज रूपात टीमसोबत जुळले असल्याचे प्रंबधनाने स्पष्ट केले होते. सैनी स्टँडबाय रूपात निवडले गेले आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पाकिस्तान की भारत कुणाकडे आहेत जास्त अणुबाँब?