Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विजय तर आज आम्हीच मिळविणार – सर्फराज अहमद

We will get victory today - Sarfraz Ahmed
बर्मिंगहॅम , बुधवार, 26 जून 2019 (14:44 IST)
दक्षिण आफ्रिकेवर मात केल्यामुळे पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यासाठी त्यांना न्यूझीलंडविरूद्ध आज येथे होणाऱ्या लढतीत विजय अनिवार्य आहे. सामन्यापूर्वी माध्यमांशी बोलताना सर्फराज याने आज आम्हीच विजय मिळविणार असा विश्वास व्यक्त केला आहे.
 
तो म्हणाला, ‘आफ्रिकेवरील विजयामुळे आमच्या खेळाडूंचा आत्मविश्‍वास वाढला आहे. उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी उत्सुक झालो आहोत. क्षेत्ररक्षणात झालेल्या चुका कशा टाळता येतील यावर आम्ही सरावात भर दिला आहे. आज आम्हीच विजय मिळविणार अशी मला खात्री आहे’, असे पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद याने सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कैलाश विजयवर्गीय पुत्र MLA आकाश यांनी निगम अधिकार्‍याला बॅटने मारले (व्हिडिओ)