Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ICC ODI World Cup 2023 : न्यूझीलंड vs पाकिस्तान

Webdunia
शनिवार, 4 नोव्हेंबर 2023 (14:22 IST)
New Zealand vs Pakistan Live Score Updates : ICC ODI World Cup 2023 चा पाचवा डबल हेडर सामना आज पाकिस्तान आणि न्यूझीलंड (PAK vs NZ) यांच्यात खेळला जात आहे. हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होत आहे.
 
या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण आजचा सामना जिंकणाऱ्या संघाला उपांत्य फेरीच्या शर्यतीत राहणे सोपे जाईल, परंतु या सामन्यापूर्वी चिन्नास्वामीमध्ये पावसाची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पावसाने सामन्यात व्यत्यय आणल्यास दोन्ही संघांना 1-1 गुणांवर समाधान मानावे लागू शकते.
 
 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाने आतापर्यंत 7 पैकी 3 सामने जिंकले आहेत आणि 4 सामने गमावले आहेत.
 
सध्या बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघ 6 गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे, तर न्यूझीलंड संघाने 7 पैकी 4 सामने जिंकले आहेत.
 
न्यूझीलंडचा संघ 8 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. सलग तीन सामने गमावल्यानंतर न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानविरुद्ध विजयाच्या इराद्याने उतरणार आहे.
 
एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या हेड-टू-हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर, पाकिस्तान नेहमीच न्यूझीलंडपेक्षा वरचढ राहिला आहे. या स्पर्धेत उभय संघांमध्ये आतापर्यंत एकूण 9 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी 7 सामने पाकिस्तानने तर 2 सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत.
 
 पाकिस्तानः अब्दुल्ला शफीक, फखर जमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), इफ्तिखार अहमद, सौद शकील, आगा सलमान, शाहीन आफ्रिदी, हसन अली, मोहम्मद वसीम जूनियर, हरिस रौफ.
 
न्यूझीलंड: डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साऊदी, ट्रेंट बोल्ट.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

हेड आणि स्मिथच्या शतकांमुळे ऑस्ट्रेलियाने 400 ओलांडली, बुमराहने 5 विकेट घेतल्या

राहुल द्रविडचा मुलगा अन्वय याने विजय मर्चंट ट्रॉफी सामन्यात नाबाद शतक झळकावले

Champions Trophy:भारतीय संघाचे सामने दुबईत होणार,लवकरच अधिकृत घोषणा

IND vs AUS: विराट कोहलीने केला हा अनोखा विक्रम, सचिननंतर असा करणारा जगातील दुसरा खेळाडू ठरला

U19 महिला आशिया चषक 2024:17 वर्षीय शबनम शकील टीम इंडियामध्ये सामील झाली

पुढील लेख
Show comments