Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिलीप वेंगसरकर

राकेश रासकर
नाव : दिलीप बळवंत वेंगसरकर
जन्म : ६ एप्रिल १९५६
ठिकाण : राजापूर (महाराष्ट्र)
देश : भारत
कसोटी पदार्पण : भारत वि न्यूझीलंड, ऑकलन्ड, १९७६
वन डे पदार्पण : भारत वि न्यूझीलंड १९७६
शैली : उजव्या हाताचा फलंदाज व मध्यमगती गोलंदाज

दिलीप वेंगसरकर हा त्याच्या काळातील शैलीदार फलंदाज होते. त्यांना कर्नल या टोपणनावाने ओळखले जाते. न्यूझीलंडविरूध्दच्या सामन्यात पदार्पण करणारे वेंगसरकर १९८३ च्या विश्वविजेत्या संघात होते.

१९८५ ते १९८७ हा त्यांच्यासाठी सुवर्णकाळ होता. या काळात त्यांनी पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडीज, श्रीलंका यांच्याविरूध्द शतके झळकावली. त्यांच्या काळात वेस्ट इंडीजचे गोलंदांज कर्दनकाळ मानले जात. कोणत्याही संघाचे फलंदाज त्यांची गोलंदाजी जास्त काळ खेळू शकत नसत. त्या काळात वेंगसरकरांनी या गोलंदाजांचा यशस्वी सामना केला. विंडीजविरूद्ध त्यांची सहा शतके आहेत.

१९८६ मध्ये त्यांनी क्रिकेटची पंढरी समजल्या जाणार्‍या लॉडर्सवर लागोपाठ तीन शतके काढली होती. त्यामुळे भारताने इंग्लंडविरूध्दची कसोटी मालिका जिंकली होती. वेंगसरकरांना मालिकावीराचा पुरस्कार मिळाला होता. या कामगिरीमुळे त्यांना १९८७ मध्ये विस्डेनचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू हा पुरस्कार मिळाला होता. १९८७ मध्ये ते भारतीय संघाचे कर्णधारही होते.

क्रिकेटमधील त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांचा पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव केला आहे. १९९२ मध्ये त्याने निवृत्ती घेतली. सप्टेंबर २००६ मध्ये भारतीय ‍क्रिकेट नियमक मंडळाने त्यांच्याकडे भारतीय निवड समितीच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवली.

कसोटी
सामने - ११६
धावा - ६८६८
सरासरी - ४२.१३
सर्वोत्तम - १६६
१००/५० - १७/३५
झेल - ७८

वन डे
सामने - १२९
धावा - ३५०८
सरासरी - ३४.७३
सर्वोत्तम - १०५
१००/५० - १/२३
झेल ३७.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

RR vs DC : आज ऋषभ पंत साठी करो या मरोचा सामना, प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी दिल्लीचा जिंकण्याचा प्रयत्न असणार

युवराज सिंहने रोहित शर्माच्या इंग्लिशची उडवली खिल्ली, सोशल मीडियावर व्हायरल झाला जबाब

SRH vs MI :मुंबईने हैदराबादचा सात गडी राखून पराभव केला

IND vs BAN Women's T20: भारतीय महिला संघाचा बांगलादेशविरुद्ध सलग चौथा विजय

Show comments