समास पहिला : देवशोधन चित्त सुचित करावें । बोलिलें तें जीवीं धरावें । सावध होऊन बैसावें । निमिष एक ॥ १॥ कोणी एके ग्रामीं अथवा देशीं । राहणें आहे आपणासी । न भेटतां तेथिल्या प्रभूसी । सौख्य कैंचें ॥ २॥ म्हणौनि ज्यास जेथें राहणें । तेणें त्या प्रभूची भेटी घेणें...