समास पहिला : देवदर्शन ॥ श्रीराम ॥ श्रोतीं व्हावें सावध । विमळ ज्ञान बाळबोध । गुरुशिष्यांचा संवाद । अति सुगम परियेसा ॥ १ ॥ नाना शास्त्रें धांडोळितां । आयुष्य पुरेना सर्वथा । अंतरी संशयाची वेथा । वाढोंचि लागे ॥ २ ॥ नाना तिर्थें थोरथोरें । सृष्टिमध्यें अपारें । सुगमें दुर्गमें...