Dharma Sangrah

पिंगळा – संत रामदास

Webdunia
शनिवार, 22 फेब्रुवारी 2025 (06:58 IST)
॥ भाकणूक ॥ वरि हनुमंतासी दुवा । महंमायासी दुवा । संतांचें सभेची दुवा । धर्मांचे सभेशीं दुवा । राजमुद्रा देवमुद्रा । ज्ञानमुद्रा ते धुरेशीं दुवा हो । वेदांत सिद्धांत दुवा । धादांत तें मज पिंगळ्याचें बोलणें गायरायनहो ॥१॥
ऐसें सर्वही सरेल । परि अविनाशी वस्तु एक उरेल । तें सज्ञान जाणतील । गायरायनहो ॥२॥
या पृथ्वीस प्रळय होईल । महाकाल पडेल । सकळ जीवन आटेल । हा मी पिंगळा बोलूनि जातों ॥३॥
शत वरुषें पाऊस जाईल । तेणें जीवसृष्टि मरेल । सूर्यो बारा कळीं तपेल । तेणें पर्वतासहित पृथ्वी जळेल । गाय० ॥४॥
पोळती शेषाचिया फडा । तो विष वमी भडभडा । पाताळ जळती धडधडा । ऐशी ब्रह्मांडींची राखोंडी होईल । गायरायनहो ॥५॥
पाऊस पडेल शुंडाधारीं । तेणें बुडेल धात्री । अग्रि प्रगटेल अंबरीं । तो करील बाहरी तया पाणियाची । तेथें सुटेल वावधान । तेणें विझेल तो आग्र । वारियासी गिळितां गगन । गगनासी राहे खाऊ । तो तामस अहंकार गायरायनहो ॥६॥
राजस बुडवील तामस अहंकारास । सात्विक बुडवील राजस अहंकाराल । गुणमाया गिळिल गुणास । अहंमाया करील गायरायनहो ॥७॥
गुणक्षोभिणी माये पोटीं । माया मूळमाया पोटीं । मूळमाया स्वरूपा पोटीं । लीन हो गायरायनहो ॥८॥
विघ्र मोठें गायरायनहो । कांहीं शांति करा हो । कांहीं त्याग करा हो । उत्तम पाहा राजा गायरायनहो ॥९॥
धुरेची रासी कोण । बापाची राशी कोण । म्यां खबर खोब मिथुन । कर्क सिंह कन्या तूळ वृश्चिक धन मकर कुंभ मीन ॥१०॥
मीनाचा मी रोग बरा । लाभ आहे गायरायनहो । थोरल्या  पुस्तकाचा शकुन पाहें । मज पिंगळ्याचे हातेन गाय० ॥११॥
बुद्धि कांडी खोविली वरी । निघाली रंकाशीं राज्यपदवी । तुझी हरपली सांपडेल ठेवी । तरी मज पिंगळ्याला विसरोन । रामीं रामदास सर्वदा भाकून गेला निजपदा । त्याचिया नेमाची शब्द । जतन करा गायरायनहो ॥१२॥
 
॥ जोगीच्छंद ॥ काळ बहिरी ससाणा बंधु तुलज्याचा जाणा । काळ पिळियेला घाणा । बहिरी हुर्मुजी नाणा । बहिरी जोग बोलणीं बोलती ॥१॥
निळया घोडयाचा रावुत । हातीं त्रिशूळ संगीत । कांवे घेतो लखलखित । उंच कास तखतखीत । ताघडोबेडसति ॥२॥ तेथें बहिरीची प्रचीति । नागखंडें झोंबती । तेथें बहिरीची प्रचीति । नागखंडें झोंबति । तेथें बहिरीची प्रचीति ॥३॥
 
॥ पहिला देव तो बद्धाचा । दुसरा देव तो मुमुक्षूचा । तिसरा देव तो साधकाचा । चवथा देव तो वेगळा । अगम्य त्याची लीळा ॥१॥
पहिला गुण महेशाचा । दुसरा गुण तो ब्रह्मयाचा । तिसरा गुण तो विष्णूचा । चौथा गुण तो वेगळा । अगम्य त्याची लीळा ॥२॥
पहिला भक्त तो कायेचा । दुसरा भक्त तो वाचेचा । तिसरा भक्त तो मनाचा । चौथा भक्त तो वेगळा । अगम्य त्याची लीळा ॥३॥
 
॥ दोहरे ॥ कानफाटया । आलेख जागे । आलेख आलेख सब कोहु कहे । आलेख आलेख सो न्यारा । जैसी कीणीही वैसी रहणी । सोई नाथका प्यारा ॥१॥
आलेख जागे । साई आलेख जागे आलेख पायाकहणी आया उसकी बात झुटी ॥२॥
गोरख गोरख सब कोहु कहे । गोरख नबुजे कोये । जोगींद्रकु जो कोई रखे सोई गोरख होय ॥३॥
नवाकके नवतुकरे ज्योरे प्राण लियो हेगा । कंथा छोड कंठ लगाय जोगी रहता नंगा ॥४॥
जनमी सीगी मनमो त्यागी जनमो बद्धा जनमो मुक्ता । कथनी कहते लोक टफावे सोहि ज्ञानका अंधा ॥५॥
जोगी भींतर मडिया पैठे करवे भींतर बाई । जीवनमें जीय देखन गया जोगीकी सुरत पायी ॥६॥
फेरी करते घरघर फीरे कीनरी बज्याई तारा । कंथा आवे कंथा जावे जोगी रहाता न्यारा ॥७॥
सिंगी बाजे बाबगाजे माईरसंडी बाडे । नाथ नबुझे गुतगुत-मेर नाथ बुझे सो छुटे ॥८॥
मुद्रा फारी कानमो डारी आपसे न फारी कोये । आपसे फोर मुद्रा पैठी सोई गोरख होय ॥९॥
जोगे न जानु जुगुत न जानु न जानु आसन ध्यान । रामकी कृपा दास न पाई आलख हुवा परिपूर्ण ॥१०॥ ॥ गीतसंखा ॥२८॥
 
 
पिंगळा समाप्त
ALSO READ: Samarth Ramdas Quotes In Marathi श्री समर्थ रामदास स्वामी यांचे सुविचार

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Somvar Mahadev Mantra Jap सोमवारी करा महादेवाच्या मंत्रांचा जप

महादेव आरती संग्रह

आरती सोमवारची

Shakambhari navratri 2025 शाकंभरी नवरात्र कधीपासून सुरू होते, या नवरात्रात आपण काय करावे?

मासिक दुर्गाष्टमीला माँ दुर्गा ची पूजा करा लाभ मिळतील

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

पुढील लेख
Show comments