Dharma Sangrah

संत रामदास यांचे पूर्ण नाव काय ?

Webdunia
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2023 (19:30 IST)
समर्थ संप्रदायाचे संस्थापक समर्थ रामदास हे महान संत होते. त्यांचं जन्म नाव नारायण सूर्याजी ठोसर असे होते. समर्थ रामदासांचा जन्म २४ मार्च १६०८ रोजी रामनवमीच्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध नवमीस झाला. ते ऋग्वेदी असून जमदग्नी हे त्यांचे गोत्र होते. ते सूर्योपासक होते.
 
रामाला व हनुमंताला उपास्य मानणाऱ्या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. ते संत तुकारामांचे समकालीन होते. राजकारण धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होते. पर्यावरणावर प्रबोधन आणि लिखाणही त्यांनी केले आहे.
 
दासबोध ग्रंथ हा समर्थ रामदासांनी रचला. त्याचे लिखाण रामदास स्वामी यांचे पट्टशिष्य कल्याण स्वामींनी केले. दासबोधाला ग्रंथराजाची उपमा दिली जाते. १७ व्या शतकात 
 
रायगड जिल्ह्यातील अत्यंत निबीड अरण्यात विसावलेल्या शिवथरची घळ या ठिकाणी हे लेखन झाले. दासबोध हा ग्रंथ एकूण २० दशकांमध्ये विभागलेला असून, प्रत्येक 
 
दशकात १० समास आहेत.  शिवथरघळ ही महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यात महाडपासून ३० किलोमीटर अंतरावर आहे.
 
एकेका समासात एक एक विषय घेऊन समर्थांनी सांसारिकांच्या, साधकांच्या, निस्पृहांच्या, विरक्तांच्या, सर्व सामान्यांच्या, बालकांच्या, प्रौढांच्या,जराजर्जरांच्या अशा सर्व जाती 
 
पंथ धर्माच्या स्त्री-पुरुषांच्या मानवी मनाला उपदेश केला आहे. या ग्रंथाचे पारायण देखील करतात.
 
समर्थांनी दोन वेळा दासबोधाची निर्मिती केली असे म्हटले जाते. पहिला दासबोध ग्रंथ २१ समासाचा होता आणि नंतरचा दासबोध २०० समासी असल्याचे सांगितले जाते. 
 
दासबोध हा असा आध्यात्मिक ग्रंथ आहे, जो सर्व ग्रन्थाचे सार आहे.
ALSO READ: संपूर्ण दासबोध Dasbodh in Marathi
दासबोधातील दशकांची नावे
स्तवनाचा दशक
मूर्खलक्षणांचा दशक
स्वगुण परीक्षा
नवविधा भक्ति
मंत्रांचा दशक
देवशोधन
चौदा ब्रह्मांचा
मायोद्भवनाम ज्ञानदशक
गु्णरूप
जगज्जोतिनाम
भीमदशक
विवेक वैराग्य
नामरूप
अखंड ध्याननाम
आत्मदशक
सप्ततिन्वयाचा दशक
प्रकृतिपुरुष
बहुजिनसी
शिकवण
पूर्णदशक
 
जुन्या दासबोधातील २१ समास
मंगलाचरण
रघुनाथध्यान
वक्तृश्रोतृलक्षण
सद्गुरूलक्षण
सच्छिष्यलक्षण
वैराग्यनिरूपण
सगुणध्यान
आत्मनिवेदन
निरभिमानशांती
विविध शिकवण
प्रारब्ध प्रयत्न
संतस्तवन
मीपणनिरसन
पूर्ण समाधान
रघुनाथचरित्र
गुरुशिष्यसंवाद
दृश्य-उच्छेद
एकंकारनिरसन
सत्संगमहिमा
शुद्धज्ञानावरण ऊर्फ अहंकार
अनिर्वाच्य ब्रह्म

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

उद्या २०२५ चा शेवटचा प्रदोष व्रत, नवीन वर्षात करिअर, आर्थिक आणि जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी विशेष पूजा

मंगळवारी हनुमान चालीसा पठण किती वेळा करावे?

Christmas Day Special Cake नाताळ निमित्त पाच प्रकारचे केक पाककृती

मंगळवारी करा श्री हनुमान स्तवन स्तोत्र पठण अर्थासह

१६ डिसेंबर पासून 'धनुर्मासारंभ', या दरम्यान काय करावे काय नाही जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

पुढील लेख
Show comments