Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

करूणात्रिपदीतील पहिले पद

वेबदुनिया
शांत होई श्रीगुरूदत्ता। मम चित्ता शमवी आता ।।धृ.।।

तूं केवळ माता जनिता। सर्वथा तूंचि हितकर्ता।। तूं आप्त स्वजन भ्राता। सर्वथा तूंचि रे त्राता। भयकर्ता तूं भयहर्ता। दंडधर्ता तूं परिपाता। तुजवांचुनि न दुजी वार्ता। तूं आर्ता आश्रयदाता।।शांत हो.।। 1।।

अपराधास्तव गुरुनाथा। जरि दंडा धरिसि यथार्था। तरि आम्ही जाउनि गाथा। तव चरणीं नमवूं माथा । तूं तथापि दंडिसि देवा। कोणाचा मग करूं धावा। सोडविता दुसरा तेव्हां। कोण दत्ता आम्हां त्राता।।शांत हो.।।2।।

तूं नटसा होउनि कोपी। दंडिताहि आम्ही पापी। पुनरपिही चुकत तथापि। आम्हांवरि नच संतापी। गच्छत: स्खलनं क्वापी। असें मानुनि नच हो कोपी निज कृपालेश रे ओपी। आम्हांवरि तूं भगवंता।।शांत हो.।।3।।

तव पदरीं असता ताता। आडमार्गी पाउल पडतां। सांभाळुनि मार्गावरता। आणिता न दुसरा त्राता बिरूदा आणुनि चित्ता। तूं पतितपावन दत्ता। वळे आतां आम्हांवरता। करूणाघन तूं गुरुनाथा।।शांत हो.।।4।।

सहकुटुंब सहपरिवार। दास आम्ही हे घरदार। तव पदीं अर्पुं असार। संसारराहित हा भार। परिहारिसी करूणासिंधो। तूं दीनानाथ सुबंधो। आम्हां अघलेश न बाधो। वासुदेव प्रार्थित दत्ता।।शांत हो.।। 5।।

रविवारी या प्रकारे सूर्यदेवाची पूजा करा, सर्व दुःख दूर होतील

रविवारी करा आरती सूर्याची

श्री जोतिबा चालीसा Jotiba Chalisa

शनी दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र

कोणाला स्वर्गात खाण्यासाठी काही मिळत नाही?

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

Show comments