Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दत्तोपासनेचे प्राचीन स्थान- गिरनार

Webdunia
ND
सौराष्ट्रातील जुनागढजवळचे हे स्‍थान दत्तोपासनेचें एक प्राचीन केंद्र आहे. नाथ संप्रदायाच्या माध्यमांतून दत्तोपासना दूरवर पसरल्याचे एक मोठे प्रत्यंतर गिरनारच्या रूपाने उभे आहे. हे दत्तमंदिर जुनागढजवळ गिरनार पर्वताच्या एका शिखरावर आहे. हिंदू, बौद्ध, जैन व इस्लाम अशा निरनिराळ्या संस्कृतिप्रवाहांचा संगम गिरनारवर झालेला आहे. अशा ठिकाणीं समन्वयकारी दत्तात्रेय उभा आहे, याला विशेष अर्थ आह े.

गिरनारवर जैन मंदिर, एका पीराचा दर्गा, गोरखनाथ मंदिर, शिवमंदिर, दोन देवीचीं मंदिरें व दत्तमंदिर अशी मंदिरे आहेत. हा पर्वत बराच उंच असून त्याच्या सर्वोच्च शिखरावर गुरु गोरखनाथाचे मंदिर आहे आणि याच्या खालोखाल असलेल्या शिखरावर चढण्यास पायर्‍या आहेत. दत्तस्थानापर्यंत जाईपर्यंत सुमारें दहा हजार पायर्‍यांची चढ-उतार करावी लागते.

दत्तोपासनेच्या इतिहासांत गिरनारचा महिमा विशेष आहे. त्या तपोभूमीत दत्त दर्शनाचा घ्यास घेऊन तप आचरणारे अनेक ज्ञाताज्ञात महात्मे होऊन गेले. निरंजन रघुनाथ, किनाराम अघोरील नारायणमहाराज जालवणकर इत्यादी दत्तोपासकांना गिरनारवरच दत्तसाक्षात्कार झाला आहे. अनंतसुत विठ्ठलाने 'दत्तप्रबोधां' त गिरनारचें माहात्म्य असें वर्णिलेलें आहे :

एक शृंगावरी गोरक्षनाथ । दुसरे शृंगावरी हिंगळजादेवी असत ।
तिसरे शृंगावरी स्वयें अवधूत । विश्रांती घेत हिंडतां ।।
नवनाथ चौर्‍यांशी सिद्ध। येथें वसती गा प्रसिद्ध ।
दत्त अविनाश तूं स्वतां सिद्ध । अद्वय अभेद्य सर्वातीत।
हिंदु आणि मुसलमान । यांसाठीं रूपें दोन ।
दत्त दातार अभिमान । द्वयस्थान शोभविलें।।

( संत साहित्याचे गाढे अभ्यासक रा. चिं. ढेरे यांच्या दत्त संप्रदायाचा इतिहासमधून साभार)

Maa lakshmi : देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुळशीला या 5 वस्तू अर्पण करा

Sita Navami 2024: आज सीता नवमीचे व्रत केल्याने मिळेल मातृत्व

श्री सीता चालीसा : सीता नवमी या एका उपायाने प्रसन्न होईल देवी

Brihaspativar upay गुरुवारी काय करावे काय नाही जाणून घ्या

आरती गुरुवारची

बेजवाबदारपणा, डॉक्टरांनी बोटाच्या जागी जिभेची केली सर्जरी

JEE Advanced 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या लिंकवरून डाउनलोड करा

नवीन पिढीला संधी देत नाहीये पीएम नरेंद्र मोदी, तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी आहे उत्सुक- उद्धव ठाकरे

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

Show comments