Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रीदत्तात्रेयांची अष्टके : अष्टक २ - यामिनीस शोभवीत, चंद्र तो...

Webdunia
गुरूवार, 17 डिसेंबर 2020 (13:59 IST)
यामिनीस शोभवीत, चंद्र तो प्रजापती । दुर्वास अवतार, तोचि श्रीरमापती ॥ श्रीरमापतीच अत्रिआश्रमात राहिला । तो अनाथनाथ-दत्त, माहुरांत पाहिला ॥१॥
जो अखंड चंद्र श्रीमुगेंद्र नाम शीखरीं । जो पाहावयासि होति, वासना मसी खरी । म्यां वियोग-ताप त्या, चकोरतुल्य साहिला । तो अनाथनाथ-दत्त, माहुरांत पाहिला ॥२॥
मायही यदा कदा, पिता कुमार मारवी । सद्‌गुरूस हांसतील. कीं उमा रमा रवी ॥ जो कुठेंचि नीगमास, दीसला न गाइला । तो अनाथनाथ-दत्त, माहुरांत पाहिला ॥३॥
अर्जुना अधीक आपुल्याहिहून बाहु दे । याचका उचीत दान दे बहूत बाहुदे ॥ जो सुरासरें धराधरें नरेंहि गाइला । तो अनाथनाथ-दत्त, माहुरांत पाहिला ॥४॥
धर्म अर्थ काम मोक्ष, ग्राम गाणगापुर । श्रीगुरुचरित्रनाम, हेंचि गाणं गा पुरं ॥ नारसिंह श्रीसरस्वती स्वरूप जाहला । तो अनाथनाथ-दत्त, माहुरांत पाहिला ॥५॥
ज्या कधींहि कष्टती न, पातकांसि तासिता । वांच्छिती सदैव पाद, मृत्तिका सिताऽसिता । जो समस्त योगज्ञानि, नन्मुनींनिं ध्याइला । तो अनाथनाथ-दत्त, माहुरांत पाहिला ॥६॥
जो रवीशशीस स्वप्रकाश रंग वर्णवी । जो प्रबोध-ज्ञान-सिंधुचे तरंग वर्णवी । जो घटांत ही मठांत, भूपटांत लीहिला । तो अनाथनाथ-दत्त, माहुरांत पाहिला ॥७॥
जो न लोटितांहि जाय, भक्त लालसें दुर । जेंवि कां पटासि स्नेह, सक्त लाल सेंदुर ॥ कीं रुपज्ञ मानिताति आम्रवृक्ष कोकिला । तो अनाथनाथ-दत्त, माहुरांत पाहिला ॥८॥
जो अनंदकंद मंद-हास्य मुख साजरा । पंकजासनीं गमेचि, नीलपंखसा जरा । जो सुगंधगंध देत, पाच जाइ जुइला । तो अनाथनाथ-दत्त, माहुरांत पाहिला ॥९॥
जो त्रिगुणरूप पूर्ण, ब्रह्म आजरामर । ज्यासि सामरादि लोक, वारिताति चामर । जो अनसूयेचिया निजूनि पायिं नाहिला । तो अनाथनाथ-दत्त, माहुरांत पाहिला ॥१०॥
हे सुधाकरासि देति, पुष्टि श्लोक आकरा । कोण या नको म्हणेल, पुण्यश्लोक ‘आ’ कार । विष्णुदास या कथामृतासि पिउनि धाइला । तो अनाथनाथ-दत्त, माहुरांत पाहिला ॥११॥
चामर अष्टक
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

गुरुवारचा हा सोपा उपाय तुम्हाला श्रीमंत करेल, आर्थिक संकट दूर होईल

आरती गुरुवारची

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

21 नोव्हेंबर रोजी गुरूपुष्यामृतयोग

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments