निरहंकार त्वत्पूर्वज । सायंदेव कथिला तूज । गाणगापुरीं वसे निज । गुरुराज साक्षाद्देव ॥१॥ हीतद्वार्ता परिसून । ये घालित लोटांगणा । देवा पाहतां हो तल्लिन । करी स्तवन प्रेमरसे ॥२॥ गुरु विचारिती क्षेम । येरु सांगे धरुनी प्रेम । भवत्सेवाकांम । धरुनी, धाम सोडियेलें ॥३॥ घ्यावीमौजभक्तिरसाची । असी इच्छा हे...