Marathi Biodata Maker

श्री सप्‍तशती गुरुचरित्र - अध्याय ४३

Webdunia
दे पुरुषार्थ नरांसी । भाद्रशुक्लचतुर्दशीसी चौदा ग्रंथी रक्तसूत्रासी । बांधीं करासी पूजुनी ॥१॥
संतोष मानुनि तो पुसे । व्रत कोणीं हें केलें कसें । गुरु म्हणे द्यूतीं घेतसे । पार्थराज्यदुर्योधन ॥२॥
अभास्त्व पावुनि पांडव । वनीं श्रमतां ये माधव । त्याला द्याया स्ववैभव । सांगे देव अनंतव्रत ॥३॥
त्वदन्यः कोनंत इति । पुसतां म्हणे मीच श्रीपती । ऐकें, सुमंतुकन्या होती । सुशीला ती पूर्वस्त्रीजा ॥
तीहो पत्‍नी कौंडिण्याची । सापत्‍न माता द्वेषी तिची । अन्यत्र न्हे तिला तोची । अनंताची पूजा घेती ॥
देवरवि श्री अनंत । वशीकारभयें अग्नींत । दोरा टाकी मुनी कुपित । दुःखाब्धींत पडे तेव्हां ॥६॥
देव माझेवर रुसला । म्हणून मुनी वनीं गेला । निर्वाणें तो मूर्च्छित पडला । त्या भेटीला श्रीमदनंत ॥७॥
जीवा त्मेशा भिन्नत्वेंशी । स्तुती करितां त्या ऋषीसी । वर दे सवैंश्वरर्येंसीं । तत्पृष्टांशा देयी मोक्ष ॥८॥
त्या अत्युदार अनंत । पुनर्वस्वृक्ष करित । म्हणोनी कृष्ण हें व्रत । करवीत पार्थाकरवीं ॥९॥
दायादादिकां मारुन । सार्वभौम धर्म होऊन । देहासह स्वर्गी जाण । गेला म्हणून करी तूं व्रत ॥१०॥
विप्र हृष्टतर होऊन । गुरुक्त तें हो व्रत करुन । राहे गुरुला सेवून। बंध तोडून मुक्त झाला ॥११॥
तूं अंतःकरणीं जाण । गुरुप्रसादे हो पूर्ण । तुमच्या वंशीं म्हणून । तुझें मन रंगलें हें ॥१२॥
याग योगादिकांवीण । तुम्हां जोडे हेंचि निधान । असे घेती भक्ती करुन । देवा करुन अपुलासा ॥१३॥
इति श्री०प०प०वा०स०वि० सारे अनंतव्रतकथनं नाम त्रिचत्वारिंशो०

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

सोमवारी पूजा करताना महादेवाच्या या मंत्राचा जप करावा

Mahadev Aarti शंकराची आरती : लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा

आरती सोमवारची

रविवार: या गोष्टी लक्षात ठेवा, पूर्ण आठवडा आनंदी राहाल

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

पुढील लेख
Show comments