rashifal-2026

श्रीदत्त उपनिषद अध्याय दुसरा

Webdunia
नाभीपासूनी उन्मेष वृत्ती । होय सोऽहम्‍ शब्दाची आवृत्ती । तेचि सदैव धरिता चित्ती । ब्रह्म हाता येतसे ॥१॥
धरिता सो सांडिता हम्‍ । अखंड चाले सोऽहम्‍ सोऽहम्‍ । याचे धरिता ध्यान । ब्रह्मज्ञान होतसे ॥२॥
हकारेण बहिर्याती । सकारेण विशेत्पुनः । हंसहंसेत्यमुं मंत्र । जीवो जपति सर्वदा ॥३॥
अजपा नाम गायत्री । योगिनां मोक्षदा सदा । अस्या संकल्पमात्रेण । सर्व पापैः प्रमुच्यते ॥४॥
कुंडलिन्यां समुदभूता । गायत्री प्राण धारिणी । प्राणविद्या महाविद्या । यस्यां वेद स वेदवित्‍ ॥५॥
सोऽहम्‍ जपता लक्ष । हाता येई अलक्ष । कोटी जपे दत्त । प्रसन्न जाणा होतसे ॥६॥
निर्विकल्प म्हणजे कल्पनातीत । त्यासी राहावे चिंतित । निर्गुण परब्रह्म अद्वैत । स्वरुप जाणा होतसे ॥७॥
सोऽहम्‍ हंसा तत्‍ त्वम्‍ असी । ते तू ब्रह्म आहेसी । सोऽहम्‍ ध्याने ऐसी । अवस्था सहज होतसे ॥८॥
स्वरुपी राहिल्या वृत्ती । अवगुण अवघेची जाती । सर्व परब्रह्म मती । देव सर्वत्र संचला ॥९॥
निरंतर स्वरुपी राहता । स्वरुपची होईजे तत्त्वता । लक्षणे अंगी बाणता । मग वेळ नाही ॥१०॥
वृत्ती ऐसी वाढवावी । पसरोनी नाहीच करावी । पूर्ण ब्रह्मास पुरवावी । ब्रह्म सर्वत्र दिसतसे ॥११॥
अभ्यासाचा मुकुटमणी । वृत्ती राहावी निर्गुणी । स्वरुपी वृत्ती लक्षणी । स्वरुपची जाणा होतसे ॥१२॥
बाह्य भलतैसे असावे । अंतरी स्वरुपी लागावे । स्वरुपी सदैव राहावे । ब्रह्म स्वरुप म्हणोनिया ॥१३॥
स्वरुपी स्वरुपची झाला । मग तो पडोनी राहिला । अथवा उठोनी पळाला । तरी तो ब्रह्म होत असे ॥१४॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

श्री गणेश जन्मकथा पुराणातून: प्रत्येक कथा एक रहस्य, वाचा संपूर्ण माहिती

माघी गणेश जयंती निमित्त बाप्पाला अर्पण करण्यासाठी पारंपारिक आणि खास पाककृती

माघी गणेश जयंती निमित्त पुण्यातील या प्रसिद्ध गणपती मंदिरांना भेट देऊन बाप्पाचा आशीर्वाद घ्या

Ganpati Stotra Marathi श्री गणपती स्तोत्र

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

सर्व पहा

नक्की वाचा

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

पुढील लेख
Show comments