Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुरूचरित्र – अध्याय दुसरा भाग 2

Webdunia
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020 (16:20 IST)
सांगे ईश्वर विष्णुसी । आश्चर्य देखिले परियेसी । दीपक शिष्य निश्चयेसी । गुरुभक्त असे जाणा ॥२१॥
गोदावरीतीरवासी । वेदधर्म म्हणिजे तापसी । त्याची सेवा अहर्निशी । करितो भावे एकचित्ते ॥२२॥
 
नाही त्रिलोकी देखिला कोणी । गुरुभक्ति करणार निर्गुणी । त्याते देखोनि माझे मनी । अतिप्रीति वर्ततसे ॥२३॥
वर देईन म्हणोनि आपण । गेलो होतो तयाजवळी जाण । गुरूचा निरोप नाही म्हणोन । न घे वर परियेसा ॥२४॥
 
अनेक दिव्यसहस्त्रवर्षी । तप करिती महाऋषि । वर मागती अहर्निशी । नाना कष्ट करोनिया ॥२५॥
तैसा तापसी योगी यांसी । नव्हे मज वर द्यावयासी । बलात्कारे देता तयासी । वर न घे तो दीपक ॥२६॥
 
तनमन अर्पूनि श्रीगुरूसी । सेवा करितो संतोषी । त्रयमूर्ति म्हणोनि गुरूसी । निश्चये भजतसे ॥२७॥
समस्त देव मातापिता । गुरुचि असे तत्त्वतां । निश्चय केला असे चित्ता । गुरु परमात्मा म्हणोनि ॥२८॥
 
किती म्हणोनि वर्णू त्यासी । अविद्या-अंधकारासी । छेदिता दीपक परियेसी । कुलदीपक नाम सत्य ॥२९॥
धर्म ज्ञान सर्व एक । गुरुचि म्हणे कुलदीपक । चरणसेवा मनःपूर्वक । करितो गुरूची भक्तीने ॥२३०॥
 
इतुके ऐकोनि शार्ङ्गधरू । पहावया गेला शिष्यगुरु । त्यांचा भक्तिप्रकारू । पाहे तये वेळी ॥३१॥
सांगितले विश्वनाथे । त्याहून दिसे आणिक तेथे । संतोषोनि दीपकाते । म्हणे विष्णु परियेसा ॥३२॥
 
दीपक म्हणे विष्णूसी । काय भक्ति देखोनि आम्हांसी । वर देतोसी परियेसी । कवण कार्या सांग मज ॥३४॥
लक्ष कोटी सहस्त्र वरुषी । तप करिती अरण्यावासी । त्यांसी करितोसी उदासी । वर न देसी नारायण ॥३५॥
 
मी तरी तुज भजत नाही । तुझे नाम स्मरत नाही । बलात्कारे येवोनि पाही । केवी देशी वर मज ॥३६॥
ऐकोनि दीपकाचे वचन । संतोषला नारायण । सांगतसे विस्तारोन । तया दीपकाप्रती देखा ॥३७॥
 
गुरुभक्ति करिसी निर्वाणेसी । म्हणोनि आम्ही जाहलो संतोषी । जे भक्ति केली त्वां गुरूसी । तेचि आम्हांसी पावली ॥३८॥
जो नर असेल गुरुभक्त जाण । तोचि माझा जीवप्राण । त्यासी वश्य झालो आपण । जे मागेल ते देतो तया ॥३९॥
 
सेवा करी माता पिता । ती पावे मज तत्त्वतां । पतिसेवा स्त्रिया करिता । तेही मज पावतसे ॥२४०॥
एखाद्या भल्या ब्राह्मणासी । यती योगेश्वर तापसी । करिती नमन भक्तीसी । तेचि मज पावे जाणा ॥४१॥
 
ऐसे ऐकोनि दीपक । नमिता झाला आणिक । विनवीतसे देख । म्हणे सिद्ध नामधारका ॥४२॥
ऐक विष्णु ह्रषीकेशी । निश्चय असो माझे मानसी । वेदशास्त्र मीमांसादिकांसी । गुरु आम्हांसी देणार ॥४३॥
 
गुरूपासोनि सर्व ज्ञान । त्रयमूर्ति होती आम्हां आधीन । आमुचा गुरुचि देव जाण । अन्यथा नाही जाण पा ॥४४॥
सर्व देव सर्व तीर्थ । गुरूचि आम्हा असे सत्य । गुरूवांचूनि आम्हां परमार्थ । काय दूर असे सांगा ॥४५॥
 
समस्त योगी सिद्धजन । गुरूवांचूनि न होती सज्ञान । ज्ञान होता ईश्वर आपण । केवी दूर असे सांगा ॥४६॥
जो वर द्याल तुम्ही मज । श्रीगुरु देतो काय चोज । याकारणे श्रीगुरुराज । भजतसे परियेसा ॥४७॥
 
संतोषोनि नारायण । म्हणे धन्य धन्य माझा प्राण । तू शिष्य-शिरोरत्‍न । बाळक तूचि आमुचा ॥४८॥
काही तरी माग आता । वर देईन तत्त्वतां । विश्वनाथ आला होता । दुसरेन वर द्यावयासी मी आलो ॥४९॥
 
आमचेनि मन संतोषी । वर माग जो तुझे मानसी । तुज वश्य झालो निर्धारेसी । जे पाहिजे ते देईन आता ॥२५०॥
दीपक म्हणे विष्णुसी । जरी वर आम्हां देसी । गुरुभक्ति होय अधिक मानसी । ऐसे मज ज्ञान द्यावे ॥५१॥
 
गुरूचे रूप आपण ओळखे । ऐसे ज्ञान देई सुखे । यापरते न मागे निके । म्हणोनि चरणी लागला ॥५२॥
दिधला वर शार्ङ्गपाणी । संतोषोनि बोले वाणी । अरे दीपका शिरोमणी । तू माझा प्राणसखा होशी ॥५३॥
 
तुवा ओळखिले गुरूसी । देखिले दृष्टी परब्रह्मासी । आणीक जरी आम्हां पुससी । सांगेन एक एकचित्ते ॥५४॥
लौकिक सुबुद्धि होय जैशी । धर्माधर्मसुमने तैशी । उत्कृष्टाहूनि उत्कृष्टेसी । स्तुति करि गा अहर्निशी ॥५५॥
 
जे जे समयी श्रीगुरूसी । तू भक्तीने स्तुति करिसी । तेणे । होऊ आम्ही संतोषी । तेचि आमुची स्तुति जाण ॥५६॥
वेद वाचिती सांगेसी । वेदान्त भाष्य अहर्निषी । वाचिती जन उत्कृष्टेसी । आम्हा पावे निर्धारी ॥५७॥
 
बोलती वेद सिद्धान्त । गुरुचि ब्रह्म असे म्हणत । याचि कारणे गुरु भजता सत्य । सर्व देवता तुज वश्य ॥५८॥
गुरु म्हणजे अक्षर दोन । अमृताचा समुद्र जाण । तयामध्ये बुडता क्षण । केवी होय परियेसा ॥५९॥
 
जयाचे ह्रदयी गुरुस्मरण । तोचि त्रिलोकी पूज्य जाण । अमृतपान सदा सगुण । तोचि शिष्य अमर होय ॥२६०॥
श्लोक ॥ यदा मम शिवस्यापि ब्रह्मणो ब्राह्मणस्य हि । अनुग्रहो भवेन्नृणां सेव्यते सद्‍गुरुस्तदा ॥६१॥
 
टीका ॥ आपण अथवा ईश्वरु । ब्रह्मा जरी देता वरु । तद्वत्‍ फलदाता गुरु । गुरु त्रैमूर्ति याचि कारणे ॥६२॥
ऐसा वर दीपकासी । दिधला विष्णूने परियेसी । ब्रह्मा सांगे कलीसी । एकचित्ते परियेसा ॥६३॥
 
वर लाधोनि दीपक । गेला गुरूचे सन्मुख । पुसतसे गुरु ऐक । तया शिष्या दीपकासी ॥६४॥
ऐक शिष्या कुळदीपका । काय दिधले वैकुंठनायका । विस्तारोनि सांगे निका । माझे मन स्थिर होय ॥६५॥
 
दीपक म्हणे गुरुसी । वर दिधला ह्रषीकेशी । म्या मागितले तयासी । गुरुभक्ति व्हावी म्हणोनिया ॥६६॥
गुरुची सेवा तत्परेसी । अंतःकरण दृढेसी । वर दिधला संतोषी । दृढभक्ति माझी तुमचे चरणी ॥६७॥
 
संतोषोनि श्रीगुरु । प्रसन्न झाला साक्षात्कारू । जीवित्वे होय तू स्थिरू । काशीपुरी वास करी ॥६८॥
तुझे वाक्य सर्वसिद्धि । तुझे घरी नवनिधि । विश्वनाथ तुझे स्वाधी । म्हणे गुरु संतोषोनि ॥६९॥
 
तुझे स्मरण जे करिती । त्यांचे कष्ट निवारण होती । श्रियायुक्त नांदती । तुझे स्मरणमात्रेसी ॥२७०॥
येणेपरी शिष्यासी । प्रसन्न झाला परियेसी । दिव्यदेह झाला तत्क्षणेसी । झाला गुरु वेदधर्म ॥७१॥
 
शिष्याचा भाव पहावयास । कुष्ठी झाला महाक्लेश । तो तापसी अतिविशेष । त्यासी कैचे पाप राहे ॥७२॥
लोकानुग्रह करावयासी । गेला होता पुरी काशी । काशीक्षेत्रमहिमा ऐसी । पाप जाय सहस्त्र जन्मीचे ॥७३॥
 
तया काशीनगरात । धर्म अथवा अधर्म-रत । वास करिती क्वचित । त्यांसि पुनर्जन्म नाही जाणा ॥७४॥
सूत म्हणे ऋषीश्वरासी । येणे प्रकारे कलीसी । सांगे ब्रह्मा परियेसी । शिष्यदीपक आख्यान ॥७५॥
 
सिद्ध म्हणे नामकरणी । दृढ मन असावे याचि गुणी । तरीच तरेल भवार्णी । गुरुभक्ति असे येणेविधी ॥७६॥
श्लोक ॥ यत्र यत्र दृढा भक्तिर्यदा कस्य महात्मनः । तत्र तत्र महादेवः प्रकाशमुपगच्छति ॥७७॥
 
टीका । जरी भक्ति असे दृढेसी । त्रिकरणसह मानसी । तोचि लाधे ईश्वरासी । ईश्वर होय तया वश्य ॥७८॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे शिष्यदीपकाख्यानं नाम द्वितीयोऽध्यायः ॥२॥
 
श्रीदत्तात्रेयार्पितमस्तु ।
 
ओवीसंख्या ॥२७९॥
गुरूचरित्रअध्यायतिसरा
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥
 
गुरूचरित्रअध्यायदुसराभाग1

 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आरती मंगळवारची

मंगळवारचे उपास कधी पासून सुरु करावे जाणून घ्या

गोविन्ददामोदरस्तोत्रम्

विष्णुपादादिकेशान्तस्तोत्रम्

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

Vaginal Itching योनीला दररोज खाज येते? या 3 प्रभावी घरगुती उपायांनी आराम मिळवा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

पुढील लेख
Show comments