॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ जय जया सिद्धमुनि । तू तारक भवार्णी । सुधारस आमुचे श्रवणी । पूर्ण केला दातारा ॥१॥ गुरुचरित्र कामधेनु । ऐकता न-धाये माझे मन । कांक्षीत होते अंतःकरण । कथामृत ऐकावया ॥२॥ ध्यान लागले श्रीगुरुचरणी । तृप्ति नव्हे...