॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीगुरु म्हणती ब्राह्मणांसी । नका भ्रमू युक्तीसी । वेदान्त न कळे ब्रह्मयासी । अनंत वेद असती ॥१॥ वेदव्यासासारिखे मुनि । नारायण अवतरोनि । वेद व्यक्त करोनि । व्यास नाम पावला ॥२॥ तेणेही नाही पूर्ण केले । साधारण सांगितले । शिष्य होते चौघे भले...