Marathi Biodata Maker

भाऊबीज (यमद्वितीया)

Webdunia
कथा व विधी  
` कार्तिक शुद्ध द्वितीयेला यमद्वितीया हे नाव आहे. हा दिवस भाऊबीज या नावानेही प्रसिद्ध आहे. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला, म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे नाव मिळाले. या दिवशी कोणत्याही पुरुषाने स्वत:च्या घरी पत्‍नीच्या हातचे अन्न घ्यायचे नसते. त्याने बहिणीच्या घरी जावे आणि तिला वस्त्रालंकार वगैरे देऊन तिच्या घरी भोजन करावे. सख्खी बहीण नसेल तर कोणत्याही बहिणीकडे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीला भगिनी मानून तिच्याकडे जेवावे, असे सांगितले आहे.

या दिवशी यमराज आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला जातो व त्या दिवशी नरकात पिचत पडलेल्या जीवांना त्या दिवसापुरते मोकळे करतो.' एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल तर तिने कोणाही परपुरुषाला भाऊ मानून ओवाळावे. ते शक्य नसल्यास चंद्राला भाऊ मानून ओवाळतात. अपमृत्यु येऊ नये म्हणून धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी व यमद्वितीयेस मृत्यूची देवता यमधर्म याचे पूजन करून त्याच्या चौदा नावांनी तर्पण करण्यास सांगितले आहे. त्यामुळे अपमृत्यु येत नाही. अपमृत्यु निवारणार्थ `श्री यमधर्मप्रीत्यर्थं यमतर्पणं करिष्ये ।' असा संकल्प करून तर्पण करावयाचे.
सर्व पहा

नवीन

Flavor Shrikhand गुढीपाडवा विशेष श्रीखंडाचे हटके आणि ट्रेंडी फ्लेवर्स नक्की ट्राय करा

कर्जमुक्तीसाठी मंगळवारी करा 'ऋणमोचक मंगल स्तोत्राचा' पाठ; जाणून घ्या अचूक विधी आणि महत्त्व

आरती मंगळवारची

चहा किंवा कॉफी प्यायल्याने उपवास मोडतो का?

नवरात्रीत देवीला कोणता नैवेद्य अर्पण करावा? 9 दिवसांचे खास भोग

सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

पुढील लेख
Show comments