Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिवाळीच्या दिवशी पोळीचा हा उपाय बदलून देईल तुमचे भाग्य

दिवाळीच्या दिवशी पोळीचा हा उपाय बदलून देईल तुमचे भाग्य
, मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018 (22:32 IST)
तुम्ही बर्‍याच वेळा आपल्या मोठ्यांकडून हे ऐकले असेल की घरातील पहिली पोळी नेहमी वेगळी काढून ठेवायला पाहिजे. कोणी याला गायीला खाऊ घालतात तर कोणी कुत्र्याला. शास्त्रानुसार घरातील पहिली पोळी नेहमी वेगळी काढून ठेवायला पाहिजे.  
 
वेगळी काढलेल्या पोळीचे चार समान तुकडे करून ऐक तुकडा गायीला तर दुसरा काळ्या कुत्र्याला खाऊ घालायला पाहिजे. उरलेल्या दोन तुकड्यांपैकी एक कावळ्यासाठी तर दुसरा घराजवळच्या चौरस्त्यावर ठेवायला पाहिजे. आता तुम्ही विचार करत असाल कर सांगायचे म्हणजे या चारी गोष्टींचा संबंध पितरांशी जोडण्यात आला आहे. असे केल्याने पितृगण प्रसन्न होतात आणि तुमच्या सर्व अडचणी दूर होण्यास मदत करतात.  
 
शास्त्रानुसार, दिवाळीच्या दिवशी, घरातील पहिली पोळी गायीला खाऊ घालायला पाहिजे. त्यानंतर घरातील बाकी सदस्यांसाठी पोळ्या बनवायला पाहिजे.  
 
हिंदू धर्मानुसार गायीला पूजनीय मानण्यात आले आहे. शास्त्रानुसार सांगण्यात आले आहे की गायीमध्ये 33 कोटी देवी-देवतांचा वास असतो. जेव्हा आम्ही दिवाळीच्या दिवशी पहिली पोळी गायीला खाऊ घालतो तेव्हा याचा अर्थ असा असतो की सर्व देवी देवतांना आम्ही पोळी खाऊ घातली आहे. असे केल्याने त्या व्यक्तीची सर्व इच्छा पूर्ण होते आणि घरात सुख समृद्धी येते. म्हणून दिवाळीच्या दिवशी घरातील पहिली पोळी गायीला जरूर खाऊ घालायला पाहिजे.    
 
दिवाळी शिवाय देखील पहिली पोळी वेगळी काढून ठेवायला पाहिजे. जर तुमच्या घरात सतत वाद विवाद होत असतील तर शनिवारी पहिली पोळी एखाद्या कुत्र्याला खाऊ घालायला पाहिजे. असे केल्याने कुटुंबात होणारे मतभेद दूर होतील आणि घरात सुख शांती राहील.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लक्ष्मी पूजनात नक्की असाव्या या 8 शुभ वस्तू