Festival Posters

Diwali 2023 Wishes दिवाळीच्या शुभेच्छा

Webdunia
* चिमूटभर माती म्हणे,
मी होईन पणती,
टीचभर कापूस म्हणे,
मी होईन वाती
थेंबभर तेल म्हणे,
मी होईन साथी
ठिणगी पेटताच फुलतीन
नव्या ज्योती
अशीच यासारखी फुलत
जावी आपली नाती.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ...
 
* आली दिवाळी उजळला देव्हारा
अंधारात या पणत्यांचा पहारा
प्रेमाचा संदेश मनात रुजावा
आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..
 
* स्नेहाचा सुगंध दरवळला
आनंदाचा सण आला
विनंती आमची परमेश्वराला
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला
आपणास आणि आपल्या परिवारास
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...
 
* फटाक्यांची माळ,
विजेची रोषणाई,
पणत्यांची आरास,
उटण्याची आंघोळ,
रांगोळीची रंगत,
फराळाची संगत,
लक्ष्मीची आराधना,
भाऊबीजेची ओढ,
दीपावलीचा सण आहे
खूपच गोड..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...
 
* दिवाळी अशी खास,
तिच्यात लक्ष्मीचा निवास…
फराळाचा सुगंधी वास,
दिव्यांची आरास…
मनाचा वाढवी उल्हास,
अशा दिवाळीच्या शुभेच्छा…
तुमच्यासाठी खास...
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!!
 
* चंद्राचा कंदील घरावरी,
चांदण्यांचे तोरण दारावरी
क्षितीजाचे रंग रांगोळीवरी,
दिवाळीचे स्वागत घरोघरी
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..
 
* दिवाळीची आली पहाट
रांगोळ्यांचा केला थाट
अभ्यंगाला मांडले पाट
उटणी, अत्तरे घमघमाट
लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट
पणत्या दारांत एकशेसाठ
आकाश दिव्यांची झगमगाट
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...
 
 
* संपू दे अंधार सारा 
उजळू दे आकाशात तारे
गंधाळल्या पहाटेस येथे 
वाहू दे आनंद वारे
दिवाळीच्या मन:  पूर्वक  शुभेच्छा...
 
* दिवाळीची आली पहाट
रांगोळ्यांचा केला थाट
अभ्यंगाला मांडले पाट
उटणी, अत्तरे घमघमाट
लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट
पणत्या दारांत एकशेसाठ
आकाश दिव्यांची झगमगाट
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..
 
* दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
  
  
Edited by - Priya Dixit   

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

२३ वर्षांनंतर मकर संक्रांतीला एक दुर्मिळ योगायोग: भूत जमात वाघावर स्वार; जूनपर्यंत सावधगिरी बाळगावी लागेल

मकर संक्रातीला झटपट घरी बनवा तिळाच्या मऊ वड्या TilGul Vadi Recipe

Budhwar Upay बुधवारी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करा

Makar Sankranti 2026 Wishes in Marathi मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी

आरती बुधवारची

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments