rashifal-2026

Diwali Mandana Design दिवाळीत या 5 सुंदर मांडना रांगोळी बनवा

Webdunia
गुरूवार, 9 नोव्हेंबर 2023 (10:27 IST)
Diwali Mandana Design दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे. अनेक घरांमध्ये दिवाळीच्या मिठाईचा आणि नवीन रंगाचा सुंगध येत असतो. या दिवशी घर अतिशय सुंदर आणि प्रेमाने सजवले जाते. तसेच या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते.
 
अतिथीचे स्वागत आमच्या घराच्या दारातून केलं जातं. त्यामुळे घराचे अंगण आणि दार सजवणे महत्त्वाचे आहे. मग ती देवी लक्ष्मी असो किंवा तुमचे पाहुणे असो. गावापासून शहरापर्यंत अनेक घरांमध्ये आजही मांडना ही कला जिवंत आहे.
 
हे आर्ट जमिनीवर माती किंवा शेण सावरुन केलं जातं. सोबतच देवघरात देखील या कलेचा वापर केला जातो. यंदा आपण ही दिवाळीच्या खास सणाला आपल्या घरात एस्थेटिक आणि ट्रेडिशनल लुक साठी diwali mandana design ट्राय करु शकता.
1. ही मांडना अगदी साधी आणि सुंदर आहे. आपण पेंट ब्रश आणि चुना किंवा पांढरा पेंट यांच्या मदतीने ते बनवू शकता. ही रचना तुमच्या अंगणात खूप सुंदर दिसेल. त्यासाठी प्रथम स्केलच्या साहाय्याने चौकोनातून डिझाईन तयार करा आणि नंतर रंग वापरा. ही रचना तुम्ही भिंतींवरही बनवू शकता.
2. हे डिझाइन देखील खूप सुंदर आहे. ही रचना तुम्ही तुमच्या अंगणात अगदी काही मिनिटांत सहज बनवू शकता. ही रचना तुळशीसोबत खूप छान दिसेल. तसेच, पूजा कक्षातही ही रचना अतिशय शुभ दिसेल. या रांगोळीत छोट्या काचेचा वापर करण्यात आला आहे.
3. मांडना रांगोळी हा प्रकार मोठ्या अंगणात खूप सुंदर दिसेल. हे बनवायलाही सोपे आहे. तुम्ही कमी वेळात अशी सुंदर रचना तयार करू शकता. तुम्ही तुळशीच्या आसपासही अशा प्रकारची रचना करू शकता. तसेच कोणाच्या तरी मदतीने तुम्ही ही रांगोळी कमी वेळात काढू शकता.
4. ही मांडना कला तुमचे मन जिंकेल. हे अगदी साधे आणि सरळ आहे. तुम्ही दाराच्या बाजूलाही अशा बॉर्डर बनवू शकता. तुमचे अंगण छोटे असेल किंवा तुम्हाला दाराची चौकट बनवायची असेल तर तुम्ही ही रचना करून पाहू शकता.
5. ही मांडना पूजा कक्षात छान दिसेल. हे एक अतिशय सोपे आणि जलद तयार होणारे डिझाइन आहे. बांगडी, वाटी किंवा प्लेटच्या मदतीने तुम्ही ही रचना अगदी परफेक्ट बनवू शकता. ही रांगोळी तुम्ही मैदा किंवा पांढर्‍या रंगाने बनवू शकता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

मकर संक्रांती 2026 रोजी तुमच्या राशीनुसार हे विशेष उपाय करा

सण आला हा संक्रांतीचा कविता

मकर संक्रांति रेसिपी तिळाची चविष्ट चिकी बनवा ,सोपी रेसिपी जाणून घ्या

Makar Sankranti Recipes मकर संक्रांतीला बनवले जाणारे काही खास पदार्थ

Makar Sankranti 2026 Wishes in Marathi मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

पुढील लेख
Show comments