साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी नव्याने खरेदी केलेल्या जमा-खर्चाच्या वह्यांचे पूजन करून लिखाणास प्रारंभ करतात. कीर्द-खतावणीच्या नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. या दिवशी स्त्रिया पतीला ओवाळतात. या दिवशी बलिप्रतिपदेचा दिवशी जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बली आणि त्याची...