Dharma Sangrah

वसुबारस 2025 : गाई-वासराच्या पूजेचे सोपे मंत्र आणि आरती

Webdunia
शुक्रवार, 17 ऑक्टोबर 2025 (07:20 IST)
वसुबारस 2025 : यंदा 17 ऑक्टोबर रोजी गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारस साजरी केली जाईल. हिंदू धर्मात गायीला अत्यंत पवित्र मानले जाते. मान्यतेनुसार गाईमध्ये देवांचा वास असतो. त्यामुळे वसुबारस या दिवशी गाईची सेवा व पूजा केल्याने जीवनात मंगल होतं आणि अनेक लाभ मिळतात.
ALSO READ: वसुबारसला गाई-वासराचे पूजन का केले जाते? कथा आणि महत्त्व जाणून घ्या
गोवत्स द्वादशी हा सण दीपावली किंवा अमावस्येपूर्वी द्वादशी तिथीला साजरा केला जातो. गायी-वासरांची पूजा करण्याबरोबरच या दिवशी उपवास करण्याचीही परंपरा आहे. या दिवशी माता आपल्या मुलाच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. मान्यतेनुसार या दिवशी गाय आणि वासराची पूजा केल्याने सर्व देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
 
पूजा विधी
गाय आणि वासराला स्नान घालून स्वच्छ करावे.
त्यांना हळद, कुंकू, गंध, फुले आणि अक्षता (तांदूळ) लावावे.
गायीच्या पायांना हळद-कुंकू लावून नमस्कार करावा.
गाय आणि वासराला गूळ, चारा, किंवा फळे अर्पण करावी.
'क्षीरोदार्णवसम्भूते सुरासुरनमस्कृते। सर्वदेवमये मातर्गृहाणार्घ्य नमो नम:॥'
मंत्र जपत गाईला आंघोळ करावी.
वरील मंत्र म्हणत गायेची पूजा आणि प्रदक्षिणा करावी.
शेवटी आरती करावी.'
ALSO READ: वसुबारस पूजा मुहूर्त 2025: शुभ वेळ आणि तिथी माहिती
गाय-वासरू पूजेचे सोपे मंत्र
हा मंत्र गायेला नमस्कार करताना आणि पूजा करताना म्हणावा
ॐ सुरभ्यै नमः | ॐ गौमातायै नमः
वासराला पूजताना हा मंत्र म्हणावा.
ॐ वत्साय नमः |
 
ॐ गौमातायै विश्वमातायै सर्वं विश्वेन संनादति |
सर्वं गवां तपोमयं गौमातरं नमाम्यहम् |
ALSO READ: Vasu Baras 2025 : वसुबारस या दिवशी काय करावे आणि काय टाळावे – शुभ-अशुभ गोष्टी
आरती
धेनू माय जगत जननी, लोकत्रय त्रिताप शमनी।
अखिल जगतास मोक्ष दानी, जिचे नि सालकृंत अवनी
निगमागम जिला गाती
निगमागम जिला गाती
वंदीती सुरवर मुनिजन। पुनित पतित जन। घेता दर्शन।
प्रियकर शिव सांबा, सुरभि सौख्यद जगदंबा ।।1।।
 
गोमुत्रात वसे गंगा, कमला गोमयात रंगा।
अखिल देवता जिचे अंगा, सदाजी प्रियकर श्रीरंगा।
जियेचे नेत्र सूर्यचंद्र
जियेचे नेत्र सूर्यचंद्र
पहा उपेंद्र गोकुळी। कृष्णवाळ अवतार नखाग्री। गोवर्धन धरुनी।
रक्षी गोवत्स कृपा करुनी ।।2।।
धेनू माय...
Edited By - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Adhik Maas 2026 : नवीन वर्ष २०२६ मध्ये 'अधिक मास' कधी? महत्तव जाणून घ्या

आरती बुधवारची

Ganpati Stotra Marathi श्री गणपती स्तोत्र

पुत्रदा एकादशी 2025: पुत्रदा एकादशीचे व्रत करण्याचे 4 फायदे जाणून घ्या

Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीचे व्रत कधी पाळावे, त्याचे महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

पुढील लेख
Show comments