दहशतवाद्यांनी राजधानी दिल्लीत केलेल्या स्फोटांविषयीची माहिती केंद्र सरकारला आधीपासूनच होती, परंतु सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप भारतीय जनतापार्टीचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केलाय.
अडवाणींच्या या आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी नकार दिला असून, अडवाणींनी जबाबदार व्यक्ती प्रमाणे वक्तव्य करावीत असा टोमणा त्यांनी लगावला आहे.
दहशतवाद विरोधी कायदा असावा का नसावा या विषयावर चर्चा करण्याची ही वेळ नसून सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्यावरच आपला भर असल्याचे ते म्हणाले.