Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

...तीन वर्षानंतर राजधानी पुन्हा हादरली

वार्ता
शनिवार, 13 सप्टेंबर 2008 (22:11 IST)
तीन वर्षानंतर पुन्हा एकदा राजधानी दिल्लीत आज झालेल्या चार बॉम्बस्फोट मालिकेने हादरली. या बॉम्बस्फोट मालिकेत 20 जण ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. राजधानीत सध्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून लोकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

तीन वर्षापूर्वी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकांचा आढावा-

23 मे 1996- लाजपत नगर येथील सेंट्रल मार्केटमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 16 जण ठार झाले होते.

9 जानेवारी 1997- आयटीओ येथील पोलिस मुख्यालयाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात 50 जण जखमी झाले होते.

1 ऑक्टोबर 1997- सदर बाजार भागात झालेल्या दोन बॉम्बस्फोटात 30 जण जखमी झाले होते.

10 ऑक्टोबर 1997- शांतीवन कौडीया पूल (किंग्जवे कॅम्प) भागात झालेल्या तीन बॉम्बस्फोटात एक जण ठार तर 16 जण जखमी झाले होते.

18 ऑक्टोबर 1997- राणी बाग बाजारात झालेल्या दोन बॉम्बस्फोटात एक जण ठार व 23 जण जखमी झाले होते.

26 ऑक्टोबर 1997- करोलबाग भागात झालेल्या दोन बॉम्बस्फोटात एक जण ठार व 34 जण जखम‍ी झाले होते.

30 नोव्हेंबर 1997- लाल किल्ला परिसरात झालेल्या दोन बॉम्बस्फोटात तीन जण ठार व 70 जण जखमी झाले होते.

30 नोव्हेंबर 1997- पंजाबी बाग पररिसरात रामपुरा चौकात ब्ल्यू लाइन बसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात चार जण ठार व 30 जण जखमी झाले होते.

22 मे 2005- दिल्ली येथील दोन चित्रपटगृहात बॉम्बस्फोटात एक जण ठार व अनेक जण जखमी झाले होते.

29 ऑक्टोंबर 2005- दिवाळीच्या आदल्या दिवशी राजधानीतील गर्दीच्या ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटात 62 जण ठार व शंभराहून अधिक जण जखमी झाले होते.
सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

सर्व पहा

नवीन

साजूक तुपाचे त्वचेवर उपयोग करा, सुंदर त्वचा मिळवा

रेडियोलॉजिस्ट मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

Health Alert : शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी हानिकारक आहे का?

नाश्त्यासाठी बनवा ओट्स इडली

Global Family Day 2025 जागतिक कुटुंब दिनाच्या निमित्ताने जाणून घ्या कुटुंबाचे महत्त्व

Show comments