Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सिद्धूचा 'लाफ्टर पंच'

Webdunia
NDND
नवज्योतसिंग सिद्धू हा माणूस क्रिकेट सोडून दोनच गोष्टी करू शकतो. एक तर प्रचंड बडबड आणि दुसरं हसणं. बाकी तो खासदार आहे. पण ही खासदारकी त्याला मिळालीय ती त्याच्या या दोन गुणांमुळेच. त्याला आयुष्यात या दोन गोष्टींव्यतिरिक्त तिसरं काही जमेल असं वाटत नाही. पण आता मी सांगणार आहे ते त्याच्या हसण्याविषयी.

आता बघा. हसण्याच्या प्रत्येकाच्या काही 'लेव्हल्स' असतात. 'फुसकुली' ते 'खळखळाट' या दोन टोकात या लेव्हल्स असतात. विनोदात किती ताकद आहे त्याच्यानुसार फुसकुलीपासून खळखळाटापर्यंत हे हास्य जाऊ शकतं. जोक अगदी फालतू असला तर अजिबात हसू येत नाही. थोडा बरा असला की एखादी रेष हलते. पण नवज्योतचं तसं नाही. एखादा विनोद कितीही फालतू हसू दे, कितीही वेळा इतरांनी ऐकलेला असू दे, त्याला हसू येणार नाही असं होणारच नाही. बरं ते हसणंही गालातल्या गालात नाही. अगदी सातमजली. खदाखदा. त्यामुळे कुणीही नाही तरी तो हसण्याची शंभर टक्के ग्यारंटी असते.

' स्टार वन'वर कोणे एकेकाळी 'लाफ्टर चॅलेंज' हा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय होता. (हा कार्यक्रम आताही आहे. पण त्यात आता काही राम नाही.) हा कार्यक्रम दोनच गोष्टींनी खूप गाजला. एक तीवर येणारी कमनीय एंकर ( काय राव कशाला आठवण करता.) आणि दुसरा नवज्योत सिद्धूचं हसणं. कुठल्याही विनोदाला हा भाऊ खदाखदा हसायचा. अगदी चावून चोथा झालेल्या विनोदावरही.

सिद्धूच्या या खळखळाटी हास्याचं गमक काय आहे माहितेय? सिद्धू म्हणे अतिशय निरागस, निष्पाप, बापडा वगैरे आहे. पतियाळातल्या समृद्ध घरात सोन्याचा चमचा तोंडात घेऊन तो जन्माला आला. पण त्याला दुनियादारी माहित नाही. छक्के पंजे माहित नाहीत. त्यामुळे आयुष्यात कायम तो 'सीधासाधा'च राहिला. ज्या काळात कट्ट्यावर जाऊन मित्रांसोबत 'गजाली' करण्याचं वय होतं, त्या काळात हा भाऊ साधू-संताची प्रवचनं ऐकायला जात होता. (कॉमेंट्री करताना सिद्धू जे 'तारे'तोडतो त्याचे मूळ हेच.) त्यामुळे ह्याची त्याची उडवत 'व्हेज', 'नॉनव्हेज' जोक ऐकण्याचा, ऐकवण्याचा अनुभव त्यानं कधी घेतलाच नाही. म्हणूनच पाचवीत जे विनोद आपण ऐकतो आणि सातवी-आठवीपर्यंत तेच विनोद अनेकदा ऐकून त्यावर हसून हसून गडाबडा लोळतो ते विनोद सिद्धूने कधी ऐकलेच नाहीत. आणि याचा फायदा कुणी उचलला माहितेय? 'लाफ्टर चॅलेंज'च्या आयोजकांनी आणि स्पर्धकांनी.

  आयोजकांना असा माणूस परीक्षक म्हणून हवा होता जो स्वतः तरी हसेल किंवा त्याला पाहून बाकीचे तरी हसतील. त्यांच्या दृष्टिने सिद्धू अगदी फिट होता. त्याचवेळी अगदी फालतूतला फालतू विनोद जरी ऐकवला तरी सिद्धू पहिल्यांदाच ऐकत असल्यासारखा हसायचा.      
आयोजकांना असा माणूस परीक्षक म्हणून हवा होता जो स्वतः तरी हसेल किंवा त्याला पाहून बाकीचे तरी हसतील. त्यांच्या दृष्टिने सिद्धू अगदी फिट होता. त्याचवेळी अगदी फालतूतला फालतू विनोद जरी ऐकवला तरी सिद्धू पहिल्यांदाच ऐकत असल्यासारखा हसायचा. त्यामुळे जोक हसण्याविना 'वायबार' गेला असे कधी घडत नसे. प्रेक्षक जरी हसले नाहीत तरी 'लाफ्टरचा' सामूहिक आवाज आणि त्यात सिद्धूचं गडगडाटी 'हास्य' हे दोन हशे शंभर टक्के ग्यारंटीसह येतात. काही वेळा तर म्हणे विनोद इतके फालतू असतात की ते तयार असलेलं 'लाफ्टर' वाजविण्याचं काम असलेला माणूसही ते विसरून जायचा. पण सिद्धू मात्र इमाने इतबारे हसायचा.

आता सिद्धूच्या नावावर एकाच्या खूनाचा गु्न्हा वगैरे आहे हे खरं. तसं सिद्धूचं टाळकं कधी सटकेल काही सांगता येत नाही. एकदा तर तो मनोज प्रभाकरलाही मारायला उठला होता. पण तो वाचला बिचारा. पण हे अपवाद. कधी कधी 'सटकणारा' असला तरी सिद्धू निरागस आहे हे खरं.

' लाफ्टर चॅलेंज'मध्ये शेखर सुमनलाही ज्या विनोदाला हसू येत नव्हतं, तिथं सिद्धू हसून हसून गडबडा लोळाण्याचे तेवढा रहायचा. आता शेखर सुमन लाफ्टर चॅलेंजच्या विनोदांना कंटाळला की सिद्धूला माहित नाही, पण त्याने हा शो सोडला. त्याची जागा घेतली ती शत्रूघ्न सिन्हाने. आता शत्रूची बातच निराळी. या भाऊला हसणंच ठाऊक नाही. चित्रपटातही त्याने कधी कॉमेडी रोल केला नाही. थोडक्यात मारामारीशिवाय दुसरं काहीही त्याला काहीही ठावकी नाही. आता हा बाबा सिद्धूशेजारी बसला की चित्र फार गमतीदार असतं. समोर फालतू विनोद सांगितला गेलेला असतो आणि शत्रूभय्यांच्या चेहर्‍यावरची रेषही हलत नसते. शेजारी सिद्धू मात्र त्या विनोदाने खुर्चीतून पडायचा तेवढा बाकी असतो.

थोडक्यात काय 'लाफ्टर चॅलेंज'ला सध्या जे काही प्रेक्षक मिळताहेत ते त्यातल्या विनोदांसाठी नाही तर सिद्धूला पहायला आणि हसणं एंजॉय करायला. कारण सिद्धू हसला तरी समोरच्या माणसाचं टेन्शन जातं. भलेही विनोद कितीक फालतू का असेना.
म्हणूनच म्हणतो सिद्धूपाजी जुग जुग जियो.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यात तुमची फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी आवळा खा

घरगुती उपाय: फक्त या 2 गोष्टींनी हा नैसर्गिक बॉडी स्क्रब घरीच बनवा

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

गोमुखासनाचे फायदे जाणून घ्या

तेनालीराम कहाणी : म्हातारा भिकारी आणि राजा कृष्णदेवरायाची उदारता

Show comments