Festival Posters

Diwali Recipe पातळ पोह्यांचा चिवडा

Webdunia
बुधवार, 12 ऑक्टोबर 2022 (18:31 IST)
साहित्य - 4 कप पातळ पोहे, 2 चमचे तेल, 1 चमचा मोहरी, 10 ते 12 कढी पत्त्याचे पाने, 1 /4 कप शेंगदाणे, 1 /4  भाजकी चणाडाळ, 1/4 खोबऱ्याचे काप, 2 चमचे काजूचे काप, 1 चमचा हळद, 1 चमचा तिखट, 1 चमचा पिठी साखर, मीठ चवी प्रमाणे.
 
कृती -
सर्वप्रथम कढई तेल तापत ठेवा आणि त्यामध्ये पातळ पोहे टाकून मध्यम आचेवर सतत ढवळत 2 ते 3 मिनिटे खमंग कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्या. पोहे बाजूला काढून ठेवा. 
 
आता कढईत तेल घालून त्यात मोहऱ्या आणि कढीपत्ता घाला. फोडणी फुटल्यावर त्यामध्ये शेंगदाणे, भाजकी चणाडाळ, खोबऱ्याचे काप आणि काजू घाला. मध्यम आचेवर तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्या. नंतर हळद - तिखट घालून हे जिन्नस पोह्यांवर घाला. त्यावर मीठ व पिठीसाखर घालून एकत्र करुन घ्यावे. पातळ पोह्याचा चिवडा खाण्यासाठी तयार. हा चिवडा हवाबंद डब्यात ठेवा.

Edited by : Smita Joshi 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

Marathi Essay होळी: रंगांचा उत्सव

नाश्त्यासाठी बनवा आरोग्यदायी रेसिपी Garlic Besan Chila

दररोज भात खाण्याचे प्रमुख आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

Career guidence : काहीतरी क्रिएटिव्ह करायचे असेल तर डिप्लोमा व्हीएफएक्स मध्ये करिअर बनवा

केसांच्या वाढीसाठी चहाचे पाणी फायदेशीर आहे

पुढील लेख
Show comments