Festival Posters

Amla Juice Recipe: आवळ्याचे ज्यूस कसे बनवावे

Webdunia
रविवार, 25 फेब्रुवारी 2024 (06:30 IST)
आवळ्याचे ज्यूस एक चविष्ट आणि आरोग्यदायी पेय आहे. जे आवळ्याच्या फळापासून बनवले जाते. आवळ्यामध्ये विटामिन C, A, B12, आयरन आणि कैल्शियम सारखे पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. हे ज्यूस रोगप्रतिकात्मक शक्ती वाढवते. तसेच पाचनतंत्र सुरळीत करते. त्वचा आणि केसांना आरोग्यदायी ठेवते. आणि वजन कमी करण्यास मदत करते. 
 
साहित्य-  
4-5 ताजे आवळे
1/2 कप पाणी 
चवीसाठी मध किंवा लिंबाचा रस
 
कृती- 
आवळा ज्यूस बनवण्यासाठी आवळे  स्वच्छ धुवून घ्यावे. आता आवळे  छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घ्यावे. त्यांच्या बिया काढून घ्याव्या. आवळयाच्या बियांमध्ये असे काही पदार्थ असतात, जे पोटासाठी नुकसानदायक असतात. म्हणून त्यांना काढून टाकावे. आता चिरलेल्या आवळयांना मिक्सरमध्ये थोडे पाणी  टाकून बारीक वाटून घ्या . तुम्हाला हवी असेल तेवढी पाण्याची मात्रा कमी जास्त करू शकता. आता गाळणीने ते मिश्रण गाळून घ्यावे. तसेच गाळलेल्या आवळयाच्या ज्यूसमध्ये मध किंवा लिंबाचा रस  मिसळा. तयार आहे आपले आरोग्यदायी आणि चविष्ट आवळा ज्यूस जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

विरजण न वापरता दही लावण्याच्या पद्धती

उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी 5 घरगुती पेय; आरोग्यासाठी फायदेशीर

Summer Recipe पारंपरिक थंडगार कोकम सरबत

कोरफडीचा रस पिण्याचे फायदे जाणून घ्या

Career in Bachelor of Science in Operation Theater Technology :बॅचलर ऑफ सायन्स इन ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी मध्ये कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

पुढील लेख
Show comments