Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हिवाळा विशेष रेसिपी : टोमॅटो सूप

Webdunia
शनिवार, 7 डिसेंबर 2024 (08:00 IST)
साहित्य-
टोमॅटो- 4
साखर -1/2 चमचा 
लोणी-1 चमचा 
काळे मिरे पूड -1/2 चमचा 
ब्रेड क्यूब्स - 5
काळे मीठ- 1/2 चमचा 
साय/ताजे क्रीम- 1 चमचा 
हिरवी कोथिंबीर- 1 चमचा 
चवीनुसार मीठ 
 
कृती 
टोमॅटो सूप बनवण्यासाठी सर्वात आधी टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यावे.आता या टोमॅटोचे मोठे तुकडे करावे.   आता एका भांड्यात दोन कप पाणी घालून मंद आचेवर गरम करण्यासाठी ठेवा. आता त्यात चिरलेला टोमॅटो घालावा. टोमॅटो शिजवून घ्यावा. टोमॅटो चांगले शिजून मऊ झाल्यावर गॅस बंद करा. आता टोमॅटो बाहेर काढून सोलून घ्यावे. यानंतर टोमॅटोचे सर्व तुकडे बारीक करूनघ्यावे. यानंतर टोमॅटोचा लगदा एका मोठ्या चाळणीतून गाळून त्याच्या बिया वेगळ्या कराव्या. सूप घट्ट वाटल्यास आवश्यकतेनुसार पाणी घालून पातळ करावे. यानंतर गॅसवर मध्यम आचेवर उकळण्यासाठी ठेवावे. सूपला उकळी आली की त्यात लोणी, काळे मीठ, साखर, मिरे पूड आणि चवीनुसार मीठ घालावे.आता पाच मिनिटे शिजवा. यानंतर गॅस बंद करावा. तर चला तयार आहे आपले चविष्ट आणि हेल्दी टोमॅटो सूप, त्यात ब्रेड क्यूब्स आणि हिरवी कोथिंबीर घालून नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्तंडभैरवाष्टक

खंडोबा मंदिर पाली सातारा

Shani dhaiya 2025 मध्ये शनीची सावली कोणत्या राशीवर?

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

पंचतंत्र : सिंह, उंट, कोल्हा आणि कावळ्याची गोष्ट

सर्व पहा

नवीन

पोटाची चरबी कमी करण्यासाठी साखर सोडणे पुरेसे नाही, या गोष्टी देखील टाळाव्या

या DIY हेअर मास्कमध्ये निर्जीव केसांच्या समस्येवर उपाय

मानसिक भूक आणि वास्तविक भूक यातील फरक कसा ओळखायचा

नात्यात दुरावा येत असेल तर या गोष्टींकडे नक्की लक्ष द्या

Kitchen Tips: चहाचे भांडे स्वच्छ करण्यासाठी या ट्रिक अवलंबवा

पुढील लेख
Show comments