Marathi Biodata Maker

Khagras Chandra Grahan 2026 भारतात कुठे कुठे दिसणार चंद्रग्रहण? स्पर्श, मोक्ष याबद्दल जाणून घ्या संपूर्ण माहिती

Webdunia
मंगळवार, 3 मार्च 2026 (06:18 IST)
Lunar eclipse time in India 2026: यंदा २०२६ चे पहिले चंद्र ग्रहण ०३ मार्च रोजी आणि दुसरे चंद्र ग्रहण २८ ऑगस्ट रोजी लागणार. पहिले चंद्रग्रहण पूर्ण चंद्रग्रहण असेल. हे चंद्रग्रहण भारतात अंदाजे २० मिनिटे आणि २८ सेकंदांसाठी दिसेल. हे चंद्रग्रहण तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता ते जाणून घेऊया.
 
खग्रास चंद्रग्रहण (ग्रस्तोदित)
फाल्गुन शु. १५, मंगळवार, दि. ३ मार्च २०२६
स्पर्श : १५.२०
संमीलन : १६.३४
मध्य : १७.०४
उन्मीलन : १७.३३
मोक्ष : १८.४८
 
हे चंद्रग्रहण भारतात ग्रस्तोदित दिसणार आहे. म्हणजे ग्रस्त असलेले चंद्रबिंब उदयास आलेले दिसेल. भारतात कोठेही या ग्रहणाचा स्पर्श, मध्य दिसणार नाही. गुजरातमधील राजकोट, वेरावळ, पोरबंदर, जामनगर, जुनागड, गांधीधाम या प्रदेशात सायंकाळी ०६.४८ नंतर सूर्यास्त होत असल्याने या प्रदेशात हे ग्रहण दिसणार नाही. म्हणून त्या प्रदेशात ग्रहणाचे कोणतेही नियम पाळू नयेत.
 
ग्रहण पुण्यकाल - चंद्रोदयापासून (आपल्या गावच्या सूर्यास्तापासून) ग्रहण मोक्षापर्यंत अल्पकाळ पुण्यकाल आहे.
 
वेधारंभ - हे ग्रहण ग्रस्तोदित असल्याने रविवारी, दि. ३ मार्च २०२६ च्या सूर्योदयापासून मोक्षापर्यंत (सायंकाळी ०६.४८ पर्यंत) ग्रहणाचे वेध पाळावेत. बाल, वृद्ध, आजारी, अशक्त व्यक्ती आणि गर्भवतींनी रविवारी सकाळी ११ पासून मोक्षापर्यंत वेध पाळावेत. वेधकाळात स्नान, देवपूजा, जप, श्राद्ध, नित्यकर्मे इ. करता येते. वेधामध्ये भोजन निषेध आहे म्हणून अन्नपदार्थ खाऊ नयेत. मात्र वेधकाळात इतर आवश्यक असे पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग करणे, झोप घेणे ही कर्मे करता येतात. ग्रहणपर्व काळात म्हणजे आपल्या गावच्या सूर्यास्तापासून मोक्षापर्यंत (सायंकाळी ०६.४८) या काळात पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग ही कर्मे करू नयेत.
 
ग्रहणाचे राशिपरत्वे फल - मिथुन, तुला, वृश्चिक, मीन या राशींना शुभफल. मेष, कर्क, धनु, कुंभ या राशींना मिश्रफल. वृषभ, सिंह, कन्या, मकर या राशींना अनिष्ट फल आहे. ज्या राशींना अनिष्ट फल आहे त्या राशीच्या व्यक्तींनी आणि गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नये.
 
ग्रहणातील कृत्ये - 
सूर्यास्त होताच स्नान करावे. 
पर्वकालामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान यापैकी जे शक्य असेल ते करावे. 
पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण चंद्रग्रहणात करावे. 
ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे. 
अशौच असता ग्रहणकालात ग्रहणासंबंधी स्नान, दान करण्यापुरती शुद्धी असते.
 
भारतातील चंद्रग्रहणाचे प्रदेशानुसार दृश्यमानता:
पूर्व आणि ईशान्य भारतातील काही भागातून पूर्ण चंद्रग्रहण दिसेल, तर पश्चिम भारतात उपछाया चंद्रग्रहण दिसेल, कारण पूर्ण ग्रहण संपल्यानंतर येथे चंद्र उगवेल.
 
भारतातील या शहरांमधून चंद्रग्रहण पाहता येईल:
नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, भुवनेश्वर, पटना, गुवाहाटी, इम्फाळ, शिलाँग, कोहिमा आणि इटानगर ही भारतातील काही प्रमुख शहरे आहेत जिथे चंद्रग्रहण वेगवेगळ्या टप्प्यात दिसेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

गुरुवारी रात्री हे ३ अचूक उपाय करा; तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील

आरती गुरुवारची

Sai Baba Puja Mantra गुरुवारी करा साईबाबांची पूजा, उपवासाचे नियम मंत्र जाणून घ्या

Akshaya Tritiya 2026 सोने किंवा चांदी खरेदी करणे शक्य नसेल तर अक्षय तृतीयेला ही 10 रुपयाची वस्तू घरी आणा आणि तितकेच पुण्य मिळवा!

Budh Stotra लक्ष्य साध्य करण्यासाठी बुध स्तोत्र पाठ

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

पुढील लेख
Show comments