Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

म्हणून राज ठाकरे यांनी पुढील काही दिवसांच्या त्यांच्या भेटी रद्द केल्या

म्हणून राज ठाकरे यांनी पुढील काही दिवसांच्या त्यांच्या भेटी रद्द केल्या
, मंगळवार, 4 जानेवारी 2022 (15:08 IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळली आहे. राज ठाकरेंनी खबरदारी म्हणून आगामी दहा दिवसातील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत, अशी माहिती आहे. ‘शिवतीर्थ’ येथे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी पुढील काही दिवसांच्या त्यांच्या भेटी रद्द केल्या आहेत.
 
राज ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील एका कर्मचाऱ्याला कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आल्यानंतर तातडीनं इतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आल्याची माहिती आहे. या सर्वांचे कोरोना चाचणी अहवाल येणे बाकी आहे.  कर्मचाऱ्यांचे चाचणी अहवाल आज किंवा उद्या सकाळपर्यंत येणं अपेक्षित आहे. सुरक्षा ताफ्यातील एकाला कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आल्यानंतर राज ठाकरे यांच्याकडून पुढील 10 दिवसातील सर्व कार्यक्रम रद्द केले असल्याची माहिती आहे. राज ठाकरेंनी त्यांच्या सर्व भेटी रद्द केल्या आहेत, अशी माहिती आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एकनाथ शिंदे आणि अरविंद सावंत यांना कोरोना लागण