Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सत्तेच्या सेमीफायनलमध्ये कॉंग्रेस वरचढ

भाषा
सोमवार, 8 डिसेंबर 2008 (14:52 IST)
लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल असलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने दमदार कामगिरी करताना तीन राज्यांची सत्ता आपल्याकडे खेचली आहे, तर भाजपला मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील सत्ता राखण्यात तेवढे यश आले आहे.

कॉंग्रेसने राजस्थानमधील 'वसुंधराराज' संपवले आहे, तर दिल्लीत शीला दीक्षितांनी विजयाची हॅटट्रिक चालवली आहे. मिझोराममध्येही कॉंग्रेसने सत्तारूढ मिझो नॅशनल फ्रंटला मात देत सत्ता प्राप्त केली आहे.

दोनशे सदस्यांच्या राजस्थान विधानसभेत कॉंग्रेस ताज्या आकडेवारीनुसार ९१ जागी आघाडीवर आहे. तर भाजप ७९ जागांवर आघाडीवर आहे. २८ जागांवर अपक्ष व इतर छोट्या पक्षांचे उमेदवार आघाडीवर आहेत.

' मध्य प्रदेशात एकही आवाज, फिर भाजपा फिर शिवराज' ही घोषणा फळली आहे. शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपने दुसर्‍यांदा राज्यात सत्ता मिळविण्याच्या दिशेने आगेकूच चालवली आहे. २३० सदस्यांच्या विधानसभेत भाजप १२० जागांवर आघाडी मिळवून आहे, तर कॉंग्रेस ९१ जागी आघाडीवर आहे. ३० जागांवर अपक्ष व इतर पक्षांचे उमेदवार पुढे आहेत.

छत्तीसगडमध्ये भाजपने ५४ जागी आघाडी घेतली आहे. कॉंग्रेस ३२ जागांवर पुढे आहे. सुरवातीला या दोन पक्षांत जबरदस्त चुरस दिसून येत होती. पण अखेरीस भाजपने निर्णायक आघाडी घेतली आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

Buldhana Sudeen Hair Fall Disease या ३ गावांमध्ये लोकांना अचानक टक्कल पडत आहे, कारण जाणून घ्या

मुल जन्माला घाला 81 हजार रुपये मिळवा, सरकारची तरुण विद्यार्थिनींना ऑफर

आम्हाला न्याय हवा पैसे नाही, अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या दाव्यांवर टीका केली

Republic Day Parade: पहिल्या प्रजासत्ताक दिनाची परेड कुठे आयोजित करण्यात आली होती?

दिल्लीत केजरीवाल शक्तिशाली, उद्धव यांची शिवसेना काँग्रेसविरुद्ध

Show comments