संत सेवालाल महाराज मानवतावादी संत होते.संत सेवालाल महाराज यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 रोजी गोलार दोडी तांडा ता.गुंटी, जिल्हा अनंतपूर (आंध्र प्रदेश) येथे बंजारा समाजातील एका गावात पशुपालक कुटुंबात भीमा नायक रामावत व आई धर्मानी यांचाकडे झाला. भीमा नाईक यांना चार मुलं होते त्यात सेवालाल हे ज्येष्ठ होते. संत सेवालाल हे लहानपणा पासून विरक्त स्वभावाचे होते. संत सेवालाल महाराज हे थोर मानवतावादी संत होते. त्यांनी मानव कल्याणासाठी गोरक्षा करण्याचा, मानवतेचा आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. ते धर्माचे रक्षण करण्यासाठी निजामाशी लढले.तसेच अनिष्ट रूढी आणि शोषणाविरुद्ध वाणीतून सामाजिक सुधारणा करण्यासाठी प्रहार केला. त्यांची जयंती महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यात शासन स्तरावर साजरी केली जाते.
बंजारा समाजाचे महान तपस्याचे दैवत संत सेवालाल महाराज हे अन्नपद भटक्या जातीचे मार्गदर्शक, समाजसुधारक व क्रांतिकारक भगवंत होते.संत सेवालाल महाराज
बंजारा समाजाचे कुलदैवत संत सेवालाल महाराज एक महापुरुष आणि पराक्रमी महात्मा होते. हे महान संत आणि थोर समाज सुधारक होते. बंजारा समाजाचे संत सेवालाल महाराज, दिल्लीचे नवाब गुलाब खान यांची गुलामगिरी स्वीकारली नाही.
दिल्ली नवाबाचा पराभव करून सेवालाल महाराजांनी दिल्लीचे राज्य जिंकले. सेवालाल संत सेवालाल महाराजांनी स्वतःच्या बंजारा बोलीत उपदेश केला.
अठराव्या शतकात बंजारा समाजाच्या लोकांना काम मिळत नव्हते. लोकांना उपासमार होत असल्यामुळे लोक चोरी करत गुन्हेगारीच्या दिशेने वाटचाल करत होते. संत सेवालाल महाराजांनी लोकांना चोरी न करण्याचा सल्ला दिला. आपण मेहनत करणारे आहोत गुन्हेगार नाही. असं केल्याने आपल्या बंजारा समाजाची बदनामी होत आहे. म्हणून असे वागू नका. ज्यामुळे आपल्या बंजारा समाजाची प्रतिमा खराब होईल.
ज्याने गरिबांवर अन्याय केला आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे. त्याला माणूस म्हणून जगण्याचा कोणताही मार्ग नाही.त्यानंतर सेवालाल महाराज आपल्या बंजारा भाषेत बोलत असत.
बंजारा समाज एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी फिरत असे, बंजारा समाजाचा विकास कधीच होणार नाही असे वाटत होते कारण बंजारा समाज जंगलात व रानमाळात फिरत असे, त्यामुळेच बंजारा समाजाची प्रगती होत नव्हती. समाजात बदल घडवून आणण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे, त्यांनी समाजाची विचारधारा बदलली .
बंजारा समाजात देवी-देवतांची पूजा केली जाते, त्यावेळी या समाजात बळी देण्याची प्रथा आहे, जन्म, मृत्यू, वर्ष किंवा सण असो, विधी, विवाह, कोणताही समारंभ असो, सणासुदीला बळी देण्याची प्रथा आहे.संत सेवालाल महाराजांनी बळी प्रथा बंद करण्याचे कार्य आयुष्यभर केले.ते म्हणाले की एखाद्या जीवाची हत्या करण्याचा अधिकार कोणालाही दिलेला नाही.
संत सेवालाल महाराज हे स्वतः शाकाहारी होते. आताही (जिल्हा वाशिम) समाधीजवळ गुळाचा प्रसाद दिला जातो.संत सेवालाल महाराज हे अहिंसेचे विचारक होते.समाजात देवाला प्रसन्न करण्यासाठी पाच हजार बकऱ्यांची कत्तल केली जाते. ही प्रथा बंद व्हावी, मी ही देवाचा भक्त आहे, देवाला प्रसन्न करण्यासाठी या बळी देण्याच्या विचारापासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी समाजा समोर केले.भक्तासाठी भजन, कीर्तन यांना अधिक महत्त्व दिले .त्यानंतर नांगरा थाळी समाजाचे पुरस्कार तयार करण्यासाठी भजने, गाणी वापरली जातात. जी व्यक्ती इतरांच्या कल्याणाचा विचार करते, ती व्यक्ती सर्वश्रेष्ठ असते. संत सेवालाल महाराज बंजारा समाजातील तरुणांमध्ये जनजागृती करण्यासाठी त्यांच्याच बोली भाषेत उपदेश करायचे.
संत सेवालाल महाराजांची शिकवण-
जंगल आणि पर्यावरणाचे रक्षण करा, स्त्रियांचा आदर करा,आणि मुली जिवंत देवी आहेत, भेदभाव करू नका, खोटं बोलू नका, व्यसन करू नका, गरजूंना अन्न द्या. सन्मानाने आयुष्य जगा., काळजी करू नका आणि संकटाला निर्भयपणे तोंड द्या, धैर्यवान आणि आत्मविश्वासू जीवन जगा.वडीलधारी माणसांचा आदर करा आणि तरुणांवर प्रेम करा आणि प्राण्यांचा देखील आदर करा, माणुसकीवर प्रेम करा.,
देवाला प्रसन्न करण्यासाठी कोणत्याही प्राणिमात्रांचा बळी देऊ नका. आयुष्यावर तर्क करा आणि सर्व अंधश्रद्धायुक्त विश्वास टाळा. कुटूंबाची आणि समाजाची काळजी घ्या आणि समाजातील बंधुता कधीही भंग करु नका.जंगलाला कधीही सोडू नका आणि जंगल नष्ट करू नका, जर आपण जंगल नष्ट केले तर आपण स्वतःला नष्ट करीत आहात.हे लक्षात घ्या. वडीलधारी माणसांचा आदर करा आणि तरुणांवर प्रेम करा आणि प्राण्यांचा देखील आदर करा.आयुष्यावर तर्क करा आणि सर्व अंधश्रद्धायुक्त विश्वास टाळा.
सेवालाल महाराज यांचे वचन :
* कोई केनी भजो पूजो मत। – भावार्थ: कोणाची पुजा अर्चा करू नका। देव मंदीरात नाही माणसात आहे।
* रपीया कटोरो पांळी वक जाय।- भावार्थः एका रूपयाला एक वाटी पाणी विकेल।
* कसाईन गावढी मत वेचो। – भावार्थः खाटीकला गाय विकू नका। पशू प्राण्यावर प्रेम करा।
* जिवते धंणीरो बीर घरेम मत लावजो। – भावार्थः जिवंत नवरा असणाऱ्या स्त्रीला आपली बायको म्हणून घरात आणू नका
* चोरी लबाडीरो धन घरेम मत लावजो। – भावार्थः चोरी करून खोट बोलून पैसा कमाऊ नका किंवा तशा पैसा घरात आणू नका।
* केरी निंदा बदी चाडी जूगली मत करजो। – भावार्थः कोनाची निंदा चाडी चूगली लावा लावी करू नका
* जाणंजो छाणंजो पछच माणजो।* – भावार्थः जाणून घ्या विचार मंथन करा नंतरच ती गोष्ट स्वीकारा।
* ये जो वातेर पत रकाडीय वोन पाने आड पान तारलीयुंव | – भावार्थः ह्या गोष्टीचा जो कोणी आदर करेल, आचरणात आणेल स्वीकार करेल
* मी त्याचे रक्षण करेन. पाना आड पान मी त्याला तारेल।
संत सेवालाल महाराज यांचे रुईगड येथे निधन झाले. आणि महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील पोहरागड येथे त्यांची समाधी आजही जगदंबेच्या मंदिरा शेजारी आहे.